Fraud sakal
ग्लोबल

Fraud News : पैशांची उधळपट्टी करणाऱ्या श्रीमंत ‘बबली’वर खटला सुरू; व्हिएतनामच्या एससीबी बँकेला फसवले

व्हिएतनाम येथील विकसक कंपनी व्हॅन थिन्ह फाटच्या अध्यक्षा असलेल्या ट्रुओंग माय लॅन यांच्यावर गुंतवणूकदारांची १२.५ अब्ज डॉलरची रक्कम वैयक्तिक कारणांसाठी उधळल्याचा आरेाप आहे.

वृत्तसंस्था

हो ची मिन्ह (व्हिएतनाम) - व्हिएतनाम देशातील सर्वांत मोठ्या सुमारे १२ अब्ज डॉलरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या ट्रुंओंग माय लॅन या उद्योजिकेविरोधात आज हो ची मिन्ह शहरातील न्यायालयात खटला सुरू करण्यात आला.

व्हिएतनाम येथील विकसक कंपनी व्हॅन थिन्ह फाटच्या अध्यक्षा असलेल्या ट्रुओंग माय लॅन यांच्यावर गुंतवणूकदारांची १२.५ अब्ज डॉलरची रक्कम वैयक्तिक कारणांसाठी उधळल्याचा आरेाप आहे. त्यांचे कुटुंब देशातील सर्वांत श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानले जाते. या गैरव्यवहारामुळे देशातील अनेक सर्वसामान्य उघड्यावर पडल्याचे म्हटले जाते. परिणामी देशातील सायगॉन कमर्शियल बँक(एससीबी) डबघाईला आली.

बँकेतून व्हिएतनामी चलनातील ३०४ ट्रिलियनचे कर्ज उचलण्यासाठी लाच देणे, बँकेच्या नियमांचे उल्लंघन करणे असा त्यांच्यावर आरोप आहे. या खटल्याच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. न्यायालयाच्या बाहेर नाराज गुंतवणूकदारांनी निदर्शने केली.

लॅन यांचे पती एरिक चू हे हॉंगकॉंगमधील अब्जाधीश असून त्यांच्यावरही बेकायदा मार्गाने कर्ज घेण्यासाठी पत्नीला मदत केल्याचा आरोप आहे. लॅन यांच्या नावावर बँकेचे ९० टक्के शेअर होते. त्यामुळे त्यांनी सहजपणे बनावट नावांनी कर्ज घेतल्याने बँकेला मोठे नुकसान झाले.

या प्रकरणात ८० आरोपी असून त्यात ४५ एससीबी अधिकारी, ‘स्टेट बँक ऑफ व्हिएतनाम’चे १५ अधिकारी, तीन सरकारी निरीक्षक आणि राज्य लेखा विभागाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील आठ आरोपी पळून गेले असून त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले आहे. हा खटला दोन महिने चालणार असून त्यासाठी हजारो साक्षीदारांची साक्ष होईल.

या गैरव्यवहाराचा ४२ हजार नागरिकांना फटका बसला आहे. आरोपी ट्रओंग माय लॅन यांना या गैरव्यवहारप्रकरणी ऑक्टोबर २०२२ मध्ये अटक केल्यानंतर बँकेच्या गुंतवणूकदारांना पैसे मिळणे बंद झाले. त्यामुळे गेल्या काही काळापासून हनोई आणि हो ची मिन्ह शहरात आंदोलन सुरू आहे.

व्हिएतनाममध्ये अलीकडच्या काळात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व्यापक प्रमाणात कारवाई केली जात आहे. २०२१ पासून १३०० हून अधिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत ३५०० हून अधिक लोकांवर आरोप निश्‍चिती करण्यात आली आहे.

व्हिएतनामला ठगविणारी महिला कोण

  • सरकारी संकेतस्थळानुसार, ट्रुओंग मायवर सायगॉन कमर्शिअल बँकेतून पैसे काढण्यासाठी बनावट कर्ज प्रकरणे दाखल केल्याचा ठपका आहे.

  • ९ फेब्रुवारी २०१८ पासून ७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ट्रुओंग माय लॅन यांनी बनावट ९१६ कर्जप्रकरणे मंजूर करून घेतले. त्यामुळे ‘एससीबी’मधून ३०४ ट्रिलियन डोंग (१२.५ अब्ज डॉलर) पेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली.

  • लाचखेारी, बँकिंग नियमांचे उल्लंघन, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ट्रुओंग माय यांच्यावर खटला चालविण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ व्हिएतनामच्या माजी अधिकाऱ्यांसह ८५ जणांवर ५.२ दशलक्ष डॉलर लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यांनाही खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

  • ट्रुओंग माय लॅनचे कुटुंब व्हिएतनाममधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.

  • १९९२ मध्ये लॅन कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या व्हॅन थिन्ह फॅट समूहाने अलिशान हॉटेलची साखळी उभारली. त्यानंतर रेस्टॉरंट, आलिशान अपार्टमेंटचीही त्यांच्याकडे मालकी. त्यांनी वित्त क्षेत्रातही गुंतवणूक केली होती.

  • ट्रुओंग माय लॅन यांच्या कथित मालमत्तेचे मूल्य २०२२ च्या व्हिएतनामच्या एकूण जीडीपीच्या तीन टक्के एवढे हेाते.

  • फेब्रुवारी २०१९ ते सप्टेंबर २०२२ या काळात ४.४ अब्ज डॉलर एवढी रक्कम त्यांच्या चालकाने एससीबी बँकेतून काढली आणि ती त्यांच्या घरी किंवा ‘व्हॅन थिन्ह फट’कंपनीच्या कार्यालयात नेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT