PM Viral News esakal
ग्लोबल

PM Viral News : या पंतप्रधानाने ५३ वर्ष लहान गर्लफ्रेंडच्या नावे केली ९०० कोटींची संपत्ती

बर्लुस्कोनी यांनी आपल्या मृत्यूपत्रात गर्लफ्रेंड मार्टा फॅससिनासाठी १०० मिलियन यूरो संपत्ती केली आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Italian PM Left 100 Million Euros For 53 Years Younger Girlfriend In Marathi : इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांनी मृत्यू पश्चात आपल्या गर्लफ्रेंडसाठी ९०० कोटी रुपये संपत्ती सोडली आहे. द गार्जियनच्या वृत्तानुसार बर्लुस्कोनी आपल्या मृत्यूपत्रात गर्लफ्रेंड मार्टा फॅससिनासाठी १०० मिलीयन यूरो म्हणजेच साधारण ९०० कोटी रुपयांची संपत्ती सोडून गेले आहेत. मागच्या महिन्यात ८६ वर्षीय बर्लुस्कोनी यांचे निधन झाले होते. तीन वेळा इटलीचे पीएम राहिलेल्या बर्लुस्कोनीची एकूण संपत्ती ६ अरब यूरोच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते.

PM Viral News

फॅससिना आणि बर्लुस्कोनी यांचे नाते २०२० मध्ये सुरू झाले होते. त्यांचे कायदेशीररित्या लग्न झालेले नव्हते. पण ते तिला पत्नी म्हणूनच संबोधित करत.

बर्लुस्कोनीची मैत्रीण म्हणून ओळखली जाणारी फॅसिना इटलीच्या कनिष्ठ सभागृहाची सदस्य देखील आहे. बर्लुस्कोनी यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या फोर्झा इटालिया या गटाचाही ती भाग आहे. बर्लुस्कोनीचे विशाल साम्राज्य सध्या त्यांची दोन मुले, मरीना आणि पियर सिल्व्हियो सांभाळत आहेत. दोघेही बराच काळ या व्यवसायाचा भाग आहेत. सध्या दोघांची बर्लुस्कोनीच्या व्यवसायात ५३ टक्के भागीदारी आहे. बर्लुस्कोनी यांनीही आपल्या अफाट संपत्तीतून 100 दशलक्ष युरो आपला भाऊ पाओलोला दिले आहेत.

PM Viral News

तीन दशके इटालियन राजकारणावर वर्चस्व गाजवणारे बर्लुस्कोनी हे देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. राजकारणी असण्यासोबतच ते एक उद्योजक, मीडिया पर्सन देखील होते. बर्लुस्कोनी यांचे 12 जून रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ल्युकेमिया चाचणीसाठी त्यांना मिलान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इथेच त्यांचा जीव गेला.

बर्लुस्कोनी यांच्या वकिलाने त्यांच्या पाच मुलांच्या उपस्थितीत बर्लुस्कोनी यांचे मृत्यूपत्र वाचले. या मृत्युपत्रात बर्लुस्कोनी यांनी लिहिले की, 'मी उपलब्ध साठा माझ्या मुलांमध्ये समान प्रमाणात विभागत आहे. मी माझी सर्व संपत्ती मरीना, पियर सिल्व्हियो, बार्बरा, एलिओनोरा आणि लुइगी यांना दिले. या सर्व लोकांना समान हक्क मिळतील.

बर्लुस्कोनी हे तीन वेळा इटलीचे पंतप्रधान होते

सिल्व्हियो बर्लुस्कोनी हे तीन वेळा इटलीचे पंतप्रधान होते. मात्र, कर फसवणुकीच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर राजकारणातून बंदी घालण्यात आली होती. ल्युकेमियाने ग्रस्त असतानाही बर्लुस्कोनी राजकारणात सक्रिय राहिले. ते देशातील सध्याच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या समर्थक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT