Kenya Hostel Fire Killed 17 Students Esakal
ग्लोबल

Viral Video: शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग, 17 विद्यार्थी जीवंत जळाले, पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Kenya School Fire: 2017 मध्ये राजधानी नैरोबी येथील एका शाळेला लागलेल्या आगीत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

आशुतोष मसगौंडे

Kenya Hostel Fire Killed 17 Students:

केनियातील एका शाळेच्या वसतिगृहात लागलेल्या आगीत 17 विद्यार्थी ठार झाले असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलीस अधिकारी रेसिला ओन्यांगो म्हणाले की, "गुरुवारी रात्री न्यारी काउंटीमधील हिलसाइड एंडराशा प्राइमरी येथे आग लागली. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. या प्रकरणासाठी जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू."

राजधानी नैरोबीमधील न्येरी काउंटी शहरातील हिलसाइड एंडराशा प्राइमरी येथे गुरुवारी उशिरा मोठी आग लागली. आगीने संपूर्ण इमारतीला वेढले त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. यावेळी जीव वाचवण्यासाठी काहींनी वस्तीगृहाच्या भिंतींवरून उड्या मारण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले.

दरम्यान परिसरातील लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

केनियाच्या निवासी शाळांमध्ये आग लागण्याच्या घटना सामान्य आहेत. या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात कारण पालकांचा वाटते की शाळेत राहिल्याने त्यांच्या मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

यापूर्वीही आगीच्या घटना

अलीकडच्या काळात केनियामध्ये शाळांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना धोका तर निर्माण होत आहेच, पण देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठीही ते गंभीर आव्हान बनले आहे.

आगीमुळे अनेक शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. अनेक शाळा तात्पुरत्या बंद कराव्या लागल्या आहेत.

शाळांमध्ये आग विझवण्याची पुरेशी व्यवस्था नाही, त्यामुळे आगीचा धोका आणखी वाढतो. 2017 मध्ये राजधानी नैरोबी येथील एका शाळेला लागलेल्या आगीत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT