रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी रशियात खासगी सैनिकांनी केलेलं बंड शांत झाल्यानंतर देशातील जनतेला संबोधित केलं. एक दिवसापूर्वी रशियातील खासगी सैन्याच्या गटानेन बंड पुकारलं हगोतं. यानंतर पुतिन यांनी त्यांचे रक्तपात टाळल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय करण्यात आले होते असेही सांगितले आहे. पुतिन यांनी झालेल्या प्रकरासाठी त्यांच्या शत्रूंना दोषी ठरवलं आहे.
पुतिन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात म्हणाले की, बंड करणारे आणि युक्रेनला आपल्याच सैनिकांनी एकमेकांच्या हत्या करावे असे वाटत होते. वॅगनर गटातील सैनिक हे मातृभूमीसाठी देशभक्त आहेत पण त्यांचा वाईटासाठी वापर केला जाणार होता. पण अखेर रशियन नागरिकांच्या एकडूटीचा विजय झाला.
पुतिन यांनी धैर्य आणि पाठिंब्यासाटी रशियन नागरिकांचे आभार मानले. ब्लॅकमेल आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. यावेळी पुतिन यांनी परिस्थीती नियंत्रणात आणल्याबद्दल बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष लुकशेंको यांचे आभार मानले.
पुतिन यांनी त्यांच्या भाषणत वॅगनर ग्रुपने जे केलं तो देशद्रोह होता असे सांगितले. देशाचे तुकडे पाडण्याच स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. या लोकां रशियन नागरिकांना लढवायचे होते र, जे यशस्वी झाले नाही. बंडखोरांची चूक अक्षम्य आहे. असे असूनही, ज्याला आपली चूक कळते, त्यांनी एकतर करारानुसार रशियन सैन्यात सामील होतील किंवा बेलारूसला निघून जावं.
याआधी वॅगनर प्रमुख येवगेनी प्रिगोझिनने सांगितलं होतं की ते फक्त त्यांची खासगी सैन्य कंपनी वॅगनरचा विनाश रोखू इच्छीत होते. तख्तापालट करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. आम्ही अन्यायाविरोधात लढत होतो. रशियन सैन्यावर टीका करताना त्यांनी त्यांचा मार्च मास्टर क्लास असल्याचे सांगितले. प्रिगोझिनने सांगितलं की रशियन सैन्याने आमचा विरोध केला नाही आणि आम्ही ७८० किमी पर्यंत मार्च करत गेलो.
क्रेमलिनने सांगितलं की आम्ही प्रिगोझिनसोबत एक डील केली होती. त्याअंतर्गत बेलारुस तो बेलारूसला परत जाईल आणि आम्ही त्याला माफ करू. दरम्यान सोमवारपर्यंत प्रिगोझिन कुठे आहे याबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाहीये. मात्र रशियन मीडियाने दावा केला आहे की तो बेलारूसची राजधानी मिन्स्कच्या हॉटेलात थांबला आहे.
रशियामध्ये काय झाले?
रशियाची खासगी सैना वॅगनर ग्रुपचा म्होरक्या प्रिगोझिनने शुक्रवारी रात्री उशिरापासून शनिवारपर्यंत अनेक संदेश प्रसारित केले . त्यात, प्रीगोझिनने दावा केला की तो आणि त्याच्या सैन्याने दक्षिण रशियन शहर रोस्तोव्हमध्ये प्रवेश केला आणि लष्करी तळांवर ताबा मिळवला आहे. यानंतर या खाजगी सैन्याने मॉस्कोवर कूच करण्याची धमकी दिली, परंतु नंतर प्रीगोझिनने अचानक माघार घेण्याची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.