Vladimir Putin Net Worth eSakal
ग्लोबल

Vladimir Putin Net Worth : इलॉन मस्क अन् जेफ बेझोसपेक्षा श्रीमंत आहेत व्लादिमीर पुतीन? नेमकी किती आहे संपत्ती?

आपल्याला एका वर्षाला केवळ 1,40,000 डॉलर्स एवढं वेतन मिळतं अशी माहिती पुतीन यांनी ऑफिशिअल रेकॉर्डवर दिली आहे. मात्र पुतीन यांची जीवनशैली रेकॉर्डवरील माहितीपेक्षा अगदीच वेगळी आहे.

Sudesh

Vladimir Putin Net Worth Reports : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबाबत बोलायचं म्हटलं, तर आपल्या डोळ्यासमोर काही ठराविक व्यक्ती येतात. यामध्ये ट्विटरचे मालक इलॉन मस्क, अमेझॉनचे मालक जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स, इनव्हेस्टर वॉरेन बफे अशा व्यक्तींचा समावेश आहे. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची संपत्ती या सर्वांपेक्षा अधिक असू शकते, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे पुतीन हे केवळ जगातील सर्वात श्रीमंत नेतेच नाही, तर सर्वात श्रीमंत व्यक्तीही ठरू शकतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणात भीतीयुक्त आदराने घेतलं जाणारं एक नाव म्हणजे व्लादिमीर पुतीन. देशाच्या गुप्तहेर संस्थेत काम केलेले पुतीन आपल्या तापट स्वभावासाठी ओळखले जातात. पुतीन यांच्याशी ज्याचं वाकडं, त्याची नदीवर लाकडं अशी काहीशी परिस्थिती रशियामध्ये आहे. ऑन रेकॉर्ड कामांपेक्षा ऑफ-रेकॉर्ड कामं करण्यावर पुतीन यांचा अधिक भर असतो. यामुळेच, त्यांच्या संपत्तीचा एक मोठा भाग ऑफ-रेकॉर्ड असल्याचं सांगणारा एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे.

पुतीन यांची नेट वर्थ ही तब्बल 200 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक असू शकते, असा दावा फॉर्च्युन मॅगझीनच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अर्थात, पुतीन यांची अधिकृत संपत्ती ही अगदी कमी आहे. आपल्याला एका वर्षाला केवळ 1,40,000 डॉलर्स एवढं वेतन मिळतं अशी माहिती पुतीन यांनी ऑफिशिअल रेकॉर्डवर दिली आहे. मात्र पुतीन यांची जीवनशैली रेकॉर्डवरील माहितीपेक्षा अगदीच वेगळी आहे. (Putin Salary)

घर अन् गाड्या

पुतीन यांनी ऑन रेकॉर्ड म्हटलं आहे, की त्यांच्याकडे एक 800 स्क्वेअर फूट मोठं अपार्टमेंट, एक ट्रेलर आणि तीन गाड्या आहेत. मात्र रिपोर्ट्समध्ये असं समोर आलं आहे, की त्यांच्याकडे काळ्या समुद्राजवळ असणारी एक मोठी हवेली देखील आहे. या हवेलीला 'पुतीन्स कंट्री कॉटेज' म्हणून ओळखलं जातं. याबाबत 1990 च्या दशकात पहिल्यांदा माहिती समोर आली होती. (Putin's Country Cottage)

पुतीन यांच्या या हवेलीमध्ये ग्रीक देवतांच्या मूर्तींची सजावट असणारा एक संगमरवरी स्वीमिंग पूल, एम्पीथिएटर, हायटेक असं आईस हॉकी रिंग, व्हेगास शैलीतील एक कॅसिनो आणि चक्क एक नाईट क्लबही असल्याचं सांगण्यात जातं. या हवेलीच्या डायनिंग रुममधील फर्निचरचीच किंमत तब्बल 5 लाख डॉलर्स असल्याचं म्हटलं जातं. तसंच यातील बाथरुममध्ये 850 डॉलर्सचा टॉयलेट ब्रश आणि 1,250 डॉलर्स किंमतीचा टॉयलेट पेपर होल्डर लावला आहे.

पुतीन यांच्या या हवेलीच्या देखभालीचाच खर्च वर्षाला सुमारे दोन मिलियन एवढा आहे. पुतीन यांच्याकडे हा एकच महाल नाही. तर याव्यतिरिक्त आणखी 19 घरंही असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ऑन रेकॉर्ड जरी त्यांच्याकडे 3 गाड्या असल्या, तरी त्यांच्या ऑफ रेकॉर्ड गाड्यांची संख्या तब्बल 700 असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. (Putin Houses and Cars)

विमाने, हेलिकॉप्टर, यॉट

याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सुमारे 58 विमाने आणि हेलिकॉप्टर असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये 71.6 कोटी डॉलर्स किंमतीचं 'दि फ्लाईंग क्रेमलिन' (The Flying Kremlin) हे विमान आणि सुमारे तेवढ्याच किंमतीची एक यॉट यांचाही समावेश आहे. या यॉटचं नाव शेहेराजादे असल्याचं म्हटलं जातं. (Vladimir Putin Planes and Yacht)

महागडी घड्याळं

पुतीन यांना महागड्या घड्याळांचीही (Putin Watch Collection) आवड आहे. त्यांच्या संग्रहात असलेल्या A. Lange & Sohne Tourbograph या घड्याळाची किंमत तब्बल पाच लाख डॉलर्स एवढी आहे. तसंच त्यांच्याकडे 60,000 डॉलर्स किंमतीचं Pateek Phillippe Perpetual घड्याळही आहे. पुतीन यांच्याकडे असणाऱ्या या दोन घड्याळांची किंमतच त्यांच्या पगाराच्या सहा पट आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT