रशियाचे (russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पौगंबर मोहम्मद (paigambar Mohammad) यांचा अपमान करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही, असे वक्तव्य केले. पुतिन यांनी २३ डिसेंबर रोजी वार्षिक पत्रकार परिषदेत मोहम्मद यांचा अपमान करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही. पैगंबराचा अपमान करणे म्हणजे इस्लामला मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावणे आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी रशियन लोकांची प्रशंसा केली आणि इतर देशांच्या नागरिकांपेक्षा ते अधिक सहनशील असल्याचे म्हटले.
पुतिन यांच्या या वक्तव्याचे पाकिस्तानचे (pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी स्वागत केले. इस्लामोफोबियाविरोधातही असाच संदेश देण्याची गरज असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही पुतिन यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. पाकिस्तानच्या सोशल मीडियावरही लोक पुतिन (Vladimir Putin) यांचे जोरदार कौतुक करीत आहेत.
रशियन न्यूज एजन्सीनुसार, पत्रकार परिषदेदरम्यान रशियन राष्ट्राध्यक्षांनी कलात्मक स्वातंत्र्यावर भर दिला. कलात्मक स्वातंत्र्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. कलात्मक स्वातंत्र्याला मर्यादा असते. अशा स्वातंत्र्याचा वापर इतर समाजाच्या भावना दुखावण्यासाठी होता कामा नये. रशियन (russia) लोक इतर संस्कृती आणि धर्मांचा आदर करतात आणि रशियन समाज बहु-जातीय आणि बहु-सांस्कृतिक समाजात विकसित झाला आहे, असेही ते म्हणाले.
अतिरेक्यांमध्ये सूड उगवला
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांचे फोटो म्हणून नाझींचे फोटो शेअर करणाऱ्यांवरही टीका केली. मोहम्मद (paigambar Mohammad) यांचे व्यंगचित्र प्रकाशित झाल्यानंतर पॅरिसमधील चार्ली हेब्दो मासिकाच्या संपादकीय कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचाही पुतिन यांनी उल्लेख केला. अशा कृत्यांमुळे अतिरेक्यांमध्ये सूड उगवला असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मांमध्ये तेढ निर्माण होते
शार्ली एब्डो हे फ्रेंच व्यंगचित्र मासिक आहे. २०१५ मध्ये पौगंबर मोहम्मद (paigambar Mohammad) यांची अनेक व्यंगचित्रे प्रकाशित केली होती. यानंतर मासिकाच्या कार्यालयावर अतिरेकी हल्ला झाला. ज्यात प्रसिद्ध व्यंगचित्रकारांसह १२ लोक मारले गेले. २००६ मध्येही पुतिन यांनी मोहम्मद यांच्या व्यंगचित्रावर आक्षेप घेत हे कृत्य अजिबात मान्य नसल्याचे म्हटले होते. या घटनांमुळे धर्मांमध्ये तेढ निर्माण होते, असे म्हणत त्यांनी निंदनीय व्यंगचित्रांचा निषेध केला. अशा कृत्यांमुळे विशिष्ट धर्माचे अनुयायी दुखावले जाते, असेही पुनित (Vladimir Putin) म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.