Putin opponent killed in odisha esakal
ग्लोबल

Putin opponent killed in odisha: खतरनाक गुप्तहेर राष्ट्राध्यक्ष झाला अन्..

सकाळ डिजिटल टीम

रशियातील सर्वाधिक मानधन घेणारे राजकारणी पावेल अँटोनोव्ह (Pavel Antonov) यांचा शनिवारी ओडिशातील हॉटेलच्या (Odisha Hotel) खिडकीतून पडून मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या पक्षाशी संबंधित आहेत. पावेल अँटोनोव्ह यांचा मृत्यूनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. अशातच अँटोनोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी केजीबीवर संशय व्यक्त केला जात आहे.

अँटोनोव्ह हे पुतिन यांच्या पक्षाशी संबंधित आहेत. मात्र, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी पुतिन यांच्यावर अनेक वेळा टीका केलीये. त्यामुळे अँटोनोव्ह यांच्या मृत्यूनंतर पुतिन यांची केजीबीचे गुप्तहेरचा प्रवास चर्चेत आला आहे.

क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

पुतीन सोव्हिएत संघाची गुप्तचर संस्था केजीबीमध्ये 16 वर्षं गुप्तहेर म्हणून काम करत होते. त्यानंतर 1991 साली राजकारणात येण्यासाठी त्यांनी केजीबीतील पदाचा राजीनामा दिला. 1989 च्या क्रांतीदरम्यान, पुतिन हे रशियन गुप्तचर एजन्सी केजीबीचे एजंट म्हणून ड्रेस्डेनमध्ये तैनात होते. हे ठिकाण जर्मनीच्या त्या भागात होते जे त्या वेळी कम्युनिस्ट पूर्व जर्मनी म्हणून ओळखले जात होते.

1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यावर अनेक आरोप झाले होते. त्यानंतर पुतिन गुप्तहेर दलाच्या एजंटमधून राजकारणी बनले. 1997 मध्ये, पुतिन रशियाचे पहिले अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या सरकारमध्ये सामील झाले. त्यांना फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचे प्रमुख (पंतप्रधान) बनवण्यात आले. येल्त्सिन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुतिन यांना कार्यवाहक अध्यक्ष बनवण्यात आले.

सोव्हिएत संघाचं विभाजन झाल्यानंतर रशियाची पत खालावायला लागली. ही घसरण थांबवून रशियाला पुन्हा आधीचं स्थान मिळवून देण्याला पुतीन यांनी सर्वाधिक प्राधान्य दिलं होतं.

सन 2000 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि 53 टक्के मते मिळवून विजय मिळवला. 2004 मध्ये पुतिन पुन्हा एकदा निवडणूक लढले आणि 71.2 टक्के मतांसह राष्ट्राध्यक्ष बनले. 2012 मध्ये पुतिन पुन्हा एकदा 63.3 टक्के मते मिळवून विजयी झाले. पुतिन 2018 मध्ये देखील जिंकले होते. दरम्यान, पुतिन हे केवळ चार वर्षे राष्ट्राध्यक्ष नव्हते.

या चार वर्षांत पुतिन राष्ट्राध्यक्ष नव्हते तेव्हा ते पंतप्रधान होते (२००८ ते २०१२ दरम्यान). रशियाची राज्यघटना राष्ट्रपतींना केवळ दोन वेळा सलग काम करण्याची परवानगी देते. हा नियम मोडण्यासाठी पुतिन त्यांच्या पहिल्या दोन टर्मनंतर पंतप्रधान झाले आणि त्यांचे विश्वासू दिमित्री मेदवेदेव यांना राष्ट्राध्यक्ष केले.

2012 मध्ये ते पुन्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2018 मध्ये पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर ते 2024 पर्यंत राष्ट्रपती राहिले असते. पण आता 67 वर्षांचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. पुतिन यांनी इथपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग निवडला आहे तो बंडखोरांना चिरडण्याच्या आणि विरोधकांना गप्प करण्याच्या घटनांनी भरलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT