Yevgeny Prigozhin News eSakal
ग्लोबल

Yevgeny Prigozhin : रशियामध्ये खासगी जेट अपघातात १० ठार! पुतीन विरोधात बंड करणारा येवगेनी प्रिगोझिनसुद्धा मृत्युमुखी?

Sudesh

रशियातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका खासगी जेटचा अपघात होऊन सुमारे दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. या विमानातून रशियातील खासगी सैन्य 'वॅगनर' ग्रुपचा प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हादेखील प्रवास करत होता, असं सांगण्यात येत आहे. येवगेनी याने काही दिवसांपूर्वीच पुतीन यांच्याविरोधात सशस्त्र बंड केलं होतं.

एएनआय वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांचा हवाला देत याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रशियाची राजधानी मॉस्कोपासून उत्तरेकडे असणाऱ्या प्रांतात हा अपघात झाला.

येवगेनीचा मृत्यू झाल्याचा दावा

दरम्यान, कित्येक विदेशी माध्यमांनी या अपघातामध्ये येवगेनीचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या विमान दुर्घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्येच येवगेनी मृत्यूमुखी पडला असल्याचंही म्हटलं जातंय.

कोण आहे येवगेनी?

येवगेनी हा वॅगनर या भाडोत्री सैनिकांच्या ग्रुपचा प्रमुख होता. त्यानेच या ग्रुपची स्थापना केली होती. रशियासाठी काम करणाऱ्या या ग्रुपने जूनमध्ये देशाचे अध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. यावेळी रशियामध्ये मोठं गृहयुद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, रक्तपात टाळण्यासाठी म्हणून येवगेनी याने लगेच हे बंड मागे घेतलं होतं.

वॅगनरचा रशियावर आरोप

वॅगनर ग्रुपने आज (बुधवारी) झालेल्या विमान दुर्घटनेसाठी रशिया जबाबदार असल्याचे आरोप केले आहेत. रशियाच्या हवाई दलाने आपल्या विमानावर हल्ला केला, त्यामुळे ते क्रॅश झालं असा आरोप वॅगनर ग्रुपने आपल्या ग्रेझोन या चॅनलवरून केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

IND vs NZ, Test: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा! लॅथमकडे नेतृत्व, तर विलियम्सन उशीराने येणार

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

SCROLL FOR NEXT