युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर (Russia) आर्थिक निर्बंध लादले. मात्र, भारतानं आपला व्यवसाय सुरूच ठेवला. त्यामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडण्याची चर्चा होती. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतासोबतच्या संबंधांवर (India America Relations) मोठं विधान केलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी भारतासोबत अमेरिकेचे 'खूप चांगले' संबंध असल्याचं म्हटलंय. त्यांनी दोनदा भारताला भेट दिलीय. बायडेन म्हणाले, 'मी दोनदा भारतात आलोय आणि पुन्हा एकदा जाणार आहे. तसेच भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत आणि कायम राहतील.'
बायडेन यांच्या आधी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) म्हणाले होते, 'आमच्या भारतीय भागीदारांशी आम्ही अनेकवेळा चर्चा केल्या आहेत. सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर, आम्ही मानतो की प्रत्येक देशाचे रशियाशी वेगळे संबंध आहेत आणि ते असू शकतात. भारताचे रशियासोबतचे संबंध अनेक दशकांपासून विकसित झाले आहेत. मात्र, त्यावेळी अमेरिका भारताशी भागीदारी करायला तयार नव्हती.'
प्राइस पुढं म्हणाले, 'भारतीय भागीदारांसोबत आमचा 'टू प्लस टू' संवाद फार पूर्वी झाला होता. I2U2 संदर्भात आम्ही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा करू. I2U2 मध्ये भारताव्यतिरिक्त, आमच्याकडं संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इस्रायल (इस्रायल) देखील आहे. भारत आमच्यासोबत अनेक भागीदारींमध्ये सामील होत आहे, यामध्ये अर्थातच क्वाडचा (Quad) समावेश आहे. क्वाडमध्ये जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. आम्ही आमच्या भारतीय भागीदारांशी अनेक चर्चा केल्या आहेत. आता आमची रणनीती अशी आहे की, प्रत्येक देशाचे रशियाशी वेगळे संबंध असतील. आता परिस्थिती बदललीय. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खरं तर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात वाढू लागले. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची भारतासोबतची भागीदारी आणखी मजबूत झाली.'
अलीकडच्या आकडेवारीनुसार, भारत आता सौदी अरेबियापेक्षा रशियाकडून जास्त तेल आयात करत आहे. या बाबतीत रशिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर, आताही भारताची बहुतांश तेल आयात इराकमधून होते. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून भारतातील तेल शुद्धीकरण कारखाने मोठ्या सवलतीत रशियन तेल खरेदी करत आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले असूनही भारत आणि इतर आशियाई देश रशियाकडून कच्चे तेल आयात करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.