What is Order of Saint Andrew the Apostle Russia given to PM Modi History details 
ग्लोबल

मोदींना मिळालेला रशियाचा सर्वोच्च पुरस्कार काय आहे? ख्रिस्ती धर्मातल्या थोर संताशी आहे खास नाते

रशियाने पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टल’ असे या पुरस्काराचे नाव आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. दरम्यान रशियाने पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टल’ असे या पुरस्काराचे नाव आहे. रशिया आणि भारत यांच्यातील विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. (What is Order of Saint Andrew the Apostle Russia given to PM Modi History details)

‘ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्र्यू द अपोस्टल’ हा पुरस्कार खुप खास आहे. या पुरस्कराचे ख्रिस्ती धर्मातल्या थोर संताशी खासं नातं आहे. त्यामुळे जगभरात सध्या या पुरस्काराची जोरदार चर्चा सुरु आहे.

तर मोदींना मिळालेल्या या पुरस्काराचे अन् ख्रिस्ती धर्मातल्या थोर संताचे नेमकं काय आहे नातं?

सेंट ॲण्ड्र्यू हे येशू ख्रिस्ताच्या बारा मूळपैकी एक अनुयायी होते. येशू ख्रिस्तांनी स्वत:च्या शिकवणीच्या प्रसारासाठी पाठविलेल्या या बारा जणांना ‘अपोस्टल’ असे म्हणतात. येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढविण्यात आल्यानंतर याच बारा अनुयायांनी जगभर प्रवास करीत येशू ख्रिस्तांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार केला, असे मानले जाते.

या बारा अनुयायांपैकी सेंट ॲण्ड्र्यू हे रशिया, ग्रीस आणि आशिया व युरोपातील इतर काही ठिकाणी येशूच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी फिरले. त्यांनीच या भागामध्ये कॉन्स्टँटिनोपल चर्चची स्थापना केली. त्यातूनच नंतर रशियन ऑर्थोडॉक्स चर्चची स्थापना झाली आहे. रशियाची एकूण लोकसंख्या १४० दशलक्ष असून, त्यापैकी ९० दशलक्ष रशियन लोक या चर्चचे अनुसरण करतात.

सेंट ॲण्ड्र्यू यासाठीच रशिया, तसेच स्कॉटलंडसारख्या देशात महत्त्वाचे मानले जातात. त्यांना या भागात आदराचे स्थान दिले जाते. स्कॉटलंड देशाच्या झेंड्यावर ‘X’ असे चिन्ह आहे. या चिन्हाला ‘सॉल्टायर’, असे म्हटले जाते. तेदेखील सेंट ॲण्ड्र्यू यांच्या चिन्हातूनच घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या देशांवर या ख्रिश्चन संताचा अधिक प्रभाव आहे. असे सांगण्यात येते की, त्यांनादेखील अशाच आकाराच्या क्रूसावर चढविण्यात आले होते.

झार पीटर द ग्रेटने १६७२-१७२५ इसवी सन १६६८ मध्ये सेंट ॲण्ड्र्यू यांना पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळवून दिले आणि उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना त्यांच्या नावाने सन्मानित करण्यास सुरुवात केली.

रशियन राज्यक्रांतीने झारशाही उलथवून टाकल्यानंतर १९१८ साली हा सन्मान बंद करण्यात आला होता. मात्र, १९९८ साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानंतर अशा प्रकारचा सन्मान पुन्हा सुरू करण्यात आला.

हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येतो?

हा पुरस्कार रशियाच्या प्रमुख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, सैन्यदलातील अधिकारी तसेच विज्ञान, संस्कृती, कला आणि अर्थव्यवस्थेशी निगडित इतर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.

हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांनाही दिला जातो. जे नेते रशियाबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सेंट ॲण्ड्र्यू यांच्या नावाने दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Most Expensive Player: ऋषभ पंतसह २ अय्यर्सना मिळालेत लिलावात विराटपेक्षा जास्त रक्कम; २० खेळाडूंची किंमत १० कोटींच्या वर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

SCROLL FOR NEXT