job sakal
ग्लोबल

Job: लवकर जॉब सोडताहेत? Quiet Quitting चा ट्रेंड होतोय व्हायरल, वाचा प्रकरण

लॉकडाऊननंतर नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे अनेक कारणे समोर आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर दर दिवशी काही काही चर्चेत येत असतं. काही मजेशीर असतं तर काही थक्क करणारं असतं. सध्या सोशल मीडियावर Quiet Quittingचा एक आगळा वेगळा ट्रेंड व्हायरल होतोय. तुम्हाला माहिती आहे का Quiet Quitting म्हणजे काय? आणि हा ट्रेंड आता का व्हायरल होतोय?

लॉकडाऊननंतर नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे अनेक कारणे समोर आली आहेत. मग कामाचं प्रेशर असो की जॉबचा ओव्हर टाईम किंवा बदलतं जीवनमान, या सर्व कारणांमुळे जॉब सोडण्याचे प्रमाण वाढले. एवढचं काय तर वर्क फ्रॉम होममुळे आता ऑफीसमध्ये कामाला येणे लोकांना न परवडण्यासारखे झाले आहेत. कौटुंबिक जबाबदार्‍या असो की राहणीमानाचा वाढता खर्च यामुळे पगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्यामुळेही लोक नोकरी सोडताहेत. यावर उपाय म्हणून Quiet Quittingचा पर्याय समोर ठेवण्यात आलाय.

Quiet Quitting म्हणजे काय?

सतत डेडिकेशनने नोकरी करणाऱ्यांनी थोडं कमी करावं. यालाच क्वाएट-क्विटिंग (Quiet Quitting) असं म्हणतात.

काही लोक असे असतात की ज्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काम करवून घेतले जातात . यामध्ये केवळ नोकरीत टिकून राहण्यासाठी किंवा बॉसला इम्प्रेस करण्यासाठी या व्यतिरिक्त प्रमोशन मिळवण्यासाठी अधिक काम केलं जातं, या गोष्टीला आळा घालण्यासाठी तसेच तुम्हाला जितके पैसे दिले जातात तितकंच काम करा आणि जास्तीचं काम अजिबात करू नका, हा या ट्रेंडमागचा उद्देश आहे.

Quiet Quitting ट्रेंड हा 2021 मध्ये आलेल्या Great Resignation ट्रेंड सारखाच सध्या व्हायरल होतोय. टिकटॉकवर @zaidleppelin या युजरपासून हा ट्रेंड सुरू झाला. सध्या हा ट्रेंड खुप व्हायरल होत असून नेटकरी या वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT