SWIFT शब्द ऐकून तुम्हाला स्विफ्ट कार आठवत असेल तर थोडं थांबा. आता आपण कार नव्हे तर SWIFT हे वित्तीय प्रणाली आहे जी रशियाविरोधात सध्या मोठे इकोनॉमिक वेपन ठरणार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला स्विफ्टपासून वेगळे करण्यासाठी जर्मनी आणि हंगेरी या दोन्ही देशांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. स्विफ्ट (Society for Worldwide Interbank Financial Telecommunication-Swift) ही एक जागतिक वित्तीय प्रणाली आहे जी सीमेपलीकडे निधी सुरळीत आणि जलद हस्तांतरण करण्यास अनुमती देते.
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाला (Russian Invasion) प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड स्टेट्स आणि त्याच्या सहयोगी आणि भागीदारांनी रशियन बँकांना ग्लोबल फायनान्स पेमेंट सिस्टम(Global Finance Payment System) ‘SWIFT' पासून वेगळे करण्यासाठी आणि रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलली आहेत. अमेरिका, यूरोपिय संघ, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटेन आणि कॅनडाच्या नेत्यामार्फत शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बंदी घालण्यात आलेल्या रशियन कंपन्या आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन केली आहे.
सोसायटी फॉल वर्ल्डवाईड इंटरबँक फायनाशिअर टेलिकम्युनिकेशन (SWIFT) जगातील प्रमूख बँकिंग संदेश सेवा आहे, जी भारतासहित 200पेक्षा जास्त साधारण 11,000 बँक आणि वित्तीय संस्थासोबत जोडले आहे. या प्रणालीला ग्लोबल फायनान्स पेमेंट सिस्टमद्वारे चालविण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. रशियाला यामधून बाहेर करण्यात आले असून त्यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.
SWIFT ची स्थापना 1973 मध्ये करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकाराच्या निधीचे हस्तांतरण हे स्वत: करत नाही पण त्यांचे एक संदेश प्रणाली आहे जी 1970 च्या दशकामध्ये टेलेक्स मशीनींवर विश्वास करण्यासाठी विकसित केली आहे. बँकांना जलद, सुरक्षित आणि स्वस्तात संचार करण्याचे साधन निर्माण करते.
बेल्जियम-आधारित नॉन-लिस्टेड फर्म ही एक बँक सहकारी आहे जी तटस्थता घोषित करते.
बँक तुम्हाला रक्कम हस्तांतरण, ग्राहकांना पैसे हस्तातंरण आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या ऑर्डरबद्दल प्रमाणित संदेश पाठवण्यासाठी करतात SWIFT प्रणाली वापर केला जातो.
200 पेक्षा जास्त देशांमध्ये 11,000 पेक्षा अधिक आर्थिक संस्था SWIFT प्रणालीचा वापर करतात, ज्यामुळे ती ग्लोबल फायनान्स पेमेंट सिस्टमसाठी महत्त्वाचे ठरते. आर्थिक क्षेत्रामध्ये दहशतवादाच्या आर्थिक पुरवठ्याला आळा घालण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.
राष्ट्रीय संघ रॉसविफ्टनुसार, वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत संयुक्त राज्य अमेरिकेनंतर दूसरा सर्वात मोठा देश रशिया आहे. जिथे या सिस्टीमसोबत जोडले गेलेल साधारण ३०० रशियन आर्थिक संस्था आहे. म्हणजेच रशियाच्या अर्ध्यापेक्षा जास्त आर्थिक संस्था SWIFTच्या सदस्य आहेत.
रशियाजवळ आपल्या अंतर्गत आर्थिक संस्थेची रचना आहे ज्यामध्ये बँक हस्तांतरणासाठी SPFS सिस्टीम आणि व्हिजा, मास्टरकार्ड सिस्टीमचे सारखे कार्ड पेमेंटसाठी Mir System देखील समाविष्ट आहे.
बँकाना स्विफ्टमधून काढणे गंभीर प्रतिबंध मानले जाते. कारण साधारण सर्व बँक या प्रणालीचा वापर करतात. रशियामध्ये आपली महत्त्वाची तेल आणि गॅसच्या निर्यातीसाठी या प्रणालीवर खूप निर्भर आहे.
रशियन बँकांवरील नवीन निर्बंधांच्या निवेदनात असे म्हटले आहे की "युनायटेड स्टेट्स आणि त्याचे सहयोगी हे सुनिश्चित करण्यासाठी निवडक रशियन बँकांना स्विफ्ट मेसेजिंग सिस्टममधून काढून टाकले जाईल." यामुळे या बँका ग्लोबल फायनान्स पेमेंट सिस्टमपासून दूर होतील आणि त्यांची जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता कमकुवत होईल. "
यामध्ये म्हटले आहे की, आम्ही प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी वचनबद्ध आहोत ज्यामुळे रशियन सेंट्रल बँकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर राखीव निधीचा पुरवठा करण्यापासून रोखता येईल, जेणेकरून आमच्या निर्बंधांचे प्रभाव कमी होणार नाहीत." यापूर्वी, युरोपियन युनियन (EU) मध्ये स्विफ्ट प्रणालीपासून रशियाच्या विभक्त होण्यावर मतभेद होते, कारण त्याचा तेल आणि गॅसच्या आयत-निर्यातीवर परिणाम होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.