Shivjayati in Japan  esakal
ग्लोबल

चिनी आणि जपानी माणूसही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकतो..!

टोकियोमधील कासाई कुमिन कान सांस्कृतिक भवनामध्ये झाला कार्यक्रम

सकाळ डिजिटल टीम

टोकियोमधील कासाई कुमिन कान सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे ७०० हून अधिक भारतीयांनी आणि ५० पेक्षा जास्त जापानी, चिनी लोकांनी शिवरायांना वंदन करण्यासाठी हजेरी लावली होती. निमित्त होते शिवजयंतीचे.

दर वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा जपानमधील टोकियोमध्ये भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. जपानमधील शिवजयंतीचे हे तिसरे वर्ष होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जपानमधील भारताचे राजदूत सी.बी.जॉर्ज हे उपस्थित होते आणि दूतावासाचे प्रथम सचिव (शिक्षण आणि संस्कृती) मनोज सिंह नेगी हे कार्यक्रमाला हजर होते.

मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यासाठी रायगडावरील मेघडंबरीच्या  प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

यावेळी प्रवेशद्वारावरील 'वाघनखाची' प्रतिकृती हे सर्वांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले. 

भगवे झेंडे, पताका, पारंपरिक वेशभूषा, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात ‘योकोहामा मंडळाच्या’ कार्यकर्त्यांनी, महिलांनी आणि मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पालखीमधून मिरवणुक काढून कार्यक्रमाला सुरुवात केली.

भव्य-दिव्यपणे चाललेली पालखी मिरवणूक पाहून खुद्द राजदूतांनासुद्धा पालखी खांद्यावर घेण्याचा मोह आवरला नाही.  यावर्षीच्या जपानमधील शिवजयंतीसाठी शिवनेरीहून शिवज्योत मशाल जपानला आणण्यात आली होती.

पारंपरिक पद्धत अवलंबून भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी येथे मशालीची विधिवत पूजा करून ती मशाल जपानला आणली होती. 

shivjayanti in japan

'शिवचरित्र महानाट्य'चा प्रयोग 

यावर्षी संस्थेने स्थानिक कलाकारांना घेऊन 'शिवचरित्र महानाट्य' सादर करण्याचा संकल्प केला. त्यानुसार शिवरायांच्या इतिहासातील महत्वाच्या घटना निवडून त्यावर आधारित दोन तासाचे महानाट्य सादर केले.

या महानाट्यामध्ये गणेशवंदना, गीते आणि महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या 'गोंधळ' सारखे नृत्य प्रकार सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. 

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषासुद्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नमंजुषेमधील विजेत्यांचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला हिंदू स्वयंसेवक संघ जपान, बिहार फाउंडेशन, टोकियो तरंग आणि शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार या संस्थांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी शेंबेकर, अवंतिका चौधरी, विकास रंजन, राजेश आवाके आणि शुभम चोले यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाप्रमाणे शिवजयंती कार्यक्रम पण भव्य-दिव्य व्हावा म्हणून संस्थेच्या सुमारे १२५ कार्यकर्ते, १०० पेक्षा जास्त कलाकारांनी मेहनत घेतली.

chhatrapati shivaji Maharaj Jayanti in Japan

भारत कल्चरल सोसायटी जपान ही जपानमधील एक भारतीय सेवाभावी संस्था असून वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सामाजिक सेवा करत असतात.

रक्तदान, भारत-जपान संस्कृतीचा मिलाप, सुट्टीच्या दिवशी रस्ते साफ-सफाई करणे, वेगवेगळ्या जपानी सामाजिक संस्थांना कार्यकर्त्यांची गरज असेल तेव्हा ते पुरवणे अशी कामे ही संस्था करत असते.

 जपानमधील या शिवजयंतीला मराठी लोकांबरोबर देशातील विविध भागातून जपानमध्ये नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक असलेल्या अनेक भारतीयांनी उपस्थिती लावली.

वाघनखाची प्रतिकृती हे मुख्य आकर्षण

नुकत्याच महाराष्ट्र सरकार आणि ब्रिटिश सरकारदरम्यान झालेल्या करारानुसार शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनख आपल्या देशात परत येत आहेत.

हेच औचित्य साधून भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने भारतातून वाघनखाची प्रतिकृती बनवून आणली होती. हे वाघनख प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्यात आले होते.

वाघनख पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी उपस्थितांनी खूप गर्दी केली आणि तो एक 'सेल्फी पॉईंट' बनला.

---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT