who chief File Photo
ग्लोबल

WHO प्रमुख म्हणतात; '२०२२मध्येच कोरोनाचा खात्मा होईल, मात्र एका अटीवर…'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) हा व्हेरिएंट सध्या जगभरात चिंतेचं कारण ठरला आहे. भारतातही आता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत असून अनेक राज्यांनी निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. कधी हा व्हेरियंट तर कधी तो व्हेरियंट, कधी दुसरी लाट (Covid Pandemic) तर कधी तिसरी लाट... नेमका हा कोरोना विषाणूचा धुमाकूळ संपणार आहे तरी कधी? असा प्रश्न जगातील सर्वांनाच पडला आहे. कोरोना विषाणूचा हा अघोरी खेळ याच वर्षांत संपू शकतो आणि तो कशाप्रकारे याचंही उत्तर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांनी दिलं आहे.

बऱ्यापैकी देशांत व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहिम सुरु असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या फक्त एकच डोस झालेली किंवा लसीचे अजिबात डोस न घेतलेली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना करोना आणि लसीकरणबाबत आपली भूमिका मांडताना म्हटलंय की, आज जगातील एकही देश कोरोनाच्या परिणामांपासून सुरक्षित नाहीये. पण चांगली गोष्ट ही आहे की आज आपल्याकडे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, करोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू घातक होऊ शकतो, आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने तो घातक होऊ शकतो, अशी भिती डॉ. टेड्रॉस यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाला पराभूत करण्यासाठी

कोरोनावर पराभूत करायचं असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल, असं टेड्रॉस यांनी म्हटलंय. जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचं संकट देखील नष्ट करू शकू, असा दावा करत ते पुढे म्हणाले की, आपण कोरोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी करोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तरच...”, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.

७० टक्के लोकसंख्या लसवंत हवी

पुढे बोलताना टेड्रॉस यांनी कोरोनाला पराभूत करण्यासाठीचा उपाय सांगताना म्हटलंय की, प्रत्येक देशातली किमान ७० टक्के लोकसंख्या पूर्ण लसवंत असायला हवी. यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करायला हवं तरच हे जागतिक लक्ष्य साधता येईल. २०२२ च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवं, असं ते म्हणाले. डॉ. टेड्रॉस यांनी सुरुवातीपासूनच गरीब देशांना मदतीचा हात देण्याचं आश्वासन श्रीमंत देशांना केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT