Fine to people who are following corona rules  
ग्लोबल

ओमिक्रॉन डेल्टापेक्षा घातक नाही, सध्याचे व्हॅक्सिन प्रभावी - WHO

ओमकार वाबळे

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने मोठा खुलासा केला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट पाच पटींनी जास्त पसरत असल्याचं समोर आलं होतं. याचसोबत नव्या व्हायरसची जनुकीय संरचना वेगळी असल्याने त्यासाठी नव्या लशीची गरज भासणार असल्याची शक्यता होती.

मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने यावर स्पष्टीकरण देत पूर्णविराम लावला आहे. नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त घातक नसल्याने त्यासाठी नव्या लशींची आवश्यकता नसल्याची माहिती WHOने दिली आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट हा वेगाने संक्रमित होत असल्याने तसेच वारंवार म्युटेट होत असल्याने लशींच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. येणाऱ्या काळात भारतात बूस्टर डोसची गरज भासणार का, या शक्यता पडताळून पाहिली जात होती. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने ही शंका दूर केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने मंगळवारी एएफपी वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली. ओमिक्रॉन हा आधीच्या प्रकारांपेक्षा अधिक गंभीर आहे किंवा विद्यमान लस त्याविरूद्ध प्रभावी ठरणार नाही, असं मानण्याचं कोणतंही कारण नाही, असं त्यांनी सांगितलं.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी AFP ला एका मुलाखतीत सांगितलं की, ओमिक्रॉन, जरी अत्यंत संसर्गजन्य असला तरी, डेल्टा सारख्या पूर्वीच्या कोविड-19 प्रकारांपेक्षा तो जास्त गंभीर नाही. याबाबत कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्या बाजारात असणाऱ्या लशींमार्फत सर्वसामान्यांचं संरक्षण होऊ शकतं.

'आमच्याकडे अत्यंत प्रभावी लशी आहेत ज्या आतापर्यंतच्या सर्व कोरोनाच्या व्हेरिएंटविरोधात उपयुक्त ठरल्या आहेत. अन्य गंभीर आजार आणि हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीतही कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही. सध्या आधीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नाही,' असं WHO च्या अधिकाऱ्याने सांगितलं.

मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास करण्यासाठी आणखी काही वेळ अपेक्षित आहे. हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे, हे योग्यरित्या जगासमोर मांडण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे, असं रायन म्हणाले.

अमेरिकेतील प्रसिद्ध संसर्गजन्यरोग तज्ञ अँथनी फौसी यांनी याच पद्धतीचं मत मांडलं. ओमिक्रॉन हा मागील डेल्टा स्ट्रेनपेक्षा अजून तरी घातक नसल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पनवेल विधानसभा मतमोजणी, प्रशांत ठाकूर आघाडीवर

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT