Who Is JD Vance Esakal
ग्लोबल

Who is JD Vence: कट्टर टीकाकार आणि भारताचा जावई! कोण आहेत ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठी निवडलेले जेडी व्हॅन्स

Vice President Of America: 39 वर्षीय जेडी व्हॅन्स 2016 मध्ये त्याच्या 'हिलबिली एलीगी' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर प्रकाशझोतात आले. ते सध्या ओहायो राज्यातील अमेरिकन सिनेटर आहेत.

आशुतोष मसगौंडे

या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ओहायोचे सिनेटर जेडी व्हॅन्सही आपले नशीब आजमावणार आहेत.

रिपब्लिकन नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी व्हॅन्स यांची उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवड केली आहे. 39 वर्षीय व्हॅन्स यांनी भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांच्याशी लग्न केले आहे. उषा या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत.

ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या ट्रुथ सोशल नेटवर्कवर लिहिले, 'खूप विचार केल्यानंतर मी ठरवले आहे की अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे ओहायोचे सिनेटर जेडी व्हॅन्स. इतर अनेकांकडे जबरदस्त प्रतिभा असली तरी जेडी व्हॅन्स यांचे नाव मी निश्चित केले आहे.

लेखक, उद्योगपती आणि राजकारणी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "जेडी यांनी मरीन कॉर्प्समध्ये अमेरिकेची सेवा केली आहे. जेडी व्हॅन्सचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले की, व्हॅन्स एक लेखक तसेच अष्टपैलू व्यक्ती आहे."

"जेडी यांनी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली आहे. याचबरोबर ते सुम्मा कम लॉड आणि येल लॉ स्कूलमधून पदवीधर आहेत. ते येल लॉ जर्नलचे संपादक आणि येल लॉ वेटरन्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील काम करत आहेत. यासह त्यांनी तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रात खूप यशस्वी व्यावसायिक कारकीर्द केली आहे," असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटेले आहे.

कोण आहेत जेडी व्हॅन्स?

जेडी व्हॅन्स यांचा जन्म २ ऑगस्ट १९८४ रोजी झाला. व्हॅन्स यांचे संगोपन आजोबा आणि आजीने केले. 39 वर्षीय जेडी व्हॅन्स 2016 मध्ये त्याच्या 'हिलबिली एलीगी' या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर प्रकाशझोतात आले. ते सध्या ओहायो राज्यातील अमेरिकन सिनेटर आहेत.

2022 मध्ये ते अमेरिकेच्या सिनेटवर निवडून गेले आहेत. 2016 मध्ये व्हॅन्स हे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर टीकाकार होते.

मात्र, आता ते ट्रम्प यांच्या सर्वात मोठ्या समर्थकांपैकी एक आहेत. राजकारणात येण्यापूर्वी व्हॅन्स यांनी यूएस मरीन कॉर्प्सच्या माध्यमातून इराक युद्धातही आपला सहभाग नोंदवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास जेडी वन्स उपराष्ट्राध्यक्ष होतील. अमेरिकेत जो उमेदवार राष्ट्राध्यक्ष बनतो, त्याचा नामनिर्देशित उपराष्ट्राध्यक्ष उमेदवारही जिंकला असे मानले जाते.

विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताचा हल्ला झाला होता, त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनता थेट भाग घेत नाही. लोक प्रथम त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी अमेरिकेचे अध्यक्ष ठरवण्यासाठी मतदान करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT