Who is Muhammad Yunus Sakal
ग्लोबल

Who is Muhammad Yunus: बांगलादेशचे पंतप्रधानपद नोबेल विजेत्याला देण्याची मागणी! कोण आहेत मोहम्मद युनूस?

राहुल शेळके

Who is Muhammad Yunus: बांगलादेश सध्या हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. आरक्षणविरोधी निदर्शने आणि हिंसक संघर्षांदरम्यान देशात सत्तापालट झाला. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि राजधानी ढाका येथून भारतात आल्या. सध्या लष्कराने देशाची कमान हाती घेतली आहे. दरम्यान, भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या समन्वयकांनी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

फेसबुकवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी मंगळवारी पहाटे हा प्रस्ताव जाहीर केला. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देत त्यांनी अंतरिम सरकारची योजना आखली आहे. त्याचवेळी बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान आज आंदोलकांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

कोण आहेत मोहम्मद युनूस?

मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी झाला. ते बांगलादेशातील एक सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना 2006 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.

युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी 1983 मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरातून नावाजले गेले. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

2009 मध्ये त्यांना युनायटेड स्टेट्स प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले. 2010 मध्ये त्यांना काँग्रेसनल गोल्ड मेडल देण्यात आले. यासोबतच त्यांना इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

कोणती पदे भूषवली?

2011 मध्ये त्यांनी युनूस सोशल बिझनेस - ग्लोबल इनिशिएटिव्ह्सची सह-स्थापना सास्किया ब्रुस्टन, सोफी आयझेनमन आणि हॅन्स रीट्झ यांच्यासोबत केली. 2012 मध्ये, त्यांना स्कॉटलंडच्या ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाचे कुलपती बनवण्यात आले.

2018 पर्यंत ते या पदावर होते. 1998 ते 2021 पर्यंत त्यांनी युनायटेड नेशन्स फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले.

ग्रामीण बँक स्थापन केली

1961 ते 1965 पर्यंत त्यांनी बांग्लादेशच्या चटगाव विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास केला. बांगलादेशात त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली आणि सूक्ष्म कर्ज कार्यक्रमही सुरू केला. 18 फेब्रुवारी 2007 रोजी मोहम्मद युनूस यांनी नागरीक शक्ती नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

मोहम्मद युनूस यांना या वर्षी बांगलादेशच्या न्यायालयाने कामगार कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर मार्चमध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT