Who is Rinson Jose  
ग्लोबल

Lebanon Pager Blasts : लेबनॉन पेजर स्फोटांमागे केरळमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा हात? तपासात धक्कादायक खुलासा

Who is Rinson Jose : लेबनॉनमध्ये झालेल्या पेजरच्या स्फोटांच्या तपासात नॉर्वे येथे राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे.

रोहित कणसे

लेबनॉनमध्ये झालेल्या पेजरच्या स्फोटांच्या तपासात नॉर्वे येथे राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. या स्फोटांमध्ये लेबनॉनमध्ये १२ लोक ठार झाले होते तर हजारो लोक जखमी झाले होते. या प्रकरणात आता केरळच्या वायनाडचे कनेक्शन असलेल्या नॉर्वेचा नागरिक रिन्सन जोस यांचे नाव समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बल्गेरियामधील ३७ वर्षीय व्यक्तीच्या मालकीच्या कंपनी दहशतवादी संघटनेला पेजर पुरवण्यामध्ये सहभागी होती.

लेबनॉनमध्ये मंगळवारी संध्याकाळी खिशात ठेवलेले पेजर्सचा अचानक स्फोट झाला. या घटनेत हिजबुल्लाचे सैनिक जखमी झाल्याचे फोटो आणि स्फोटाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या स्फोटासाठी कारणभूत असल्याचा आरोप हिजबुल्लाने थेट इस्त्राईलवर केला आहे.

प्राथमीक माहितीनुसार, कथितरित्या मोसादकडून तीन ग्रॅम स्फोटके लपवण्यासाठी मॉडिफाइड केलेले पेजर, एखा तैवान येथील कंपनी गोल्ड अपोलो कडून तयार करण्यात आले होते. पण कंपनीने एका निवेदनात सांगितेल की स्फोटाच्या घटना घडल्या ते पेजर मॉडल, AR-924 हे हंगेरीच्या बुडापेस्ट येथील कंपनी BAC कंसल्टिंग KFT ने बनवले आणि विकले होते. या कंपनीला ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.

बल्गेरिया राज्य सुरक्षा एजंसी DANS ने सांगितले की ते मंत्रालयाशी संपर्कात आहेत आणि नॉर्टा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या भूमिकेचा तपास करत आहेत. या कंपनीची नोंदणी २०२२ मध्ये सोफिया येथे करण्यात आली आहे. जी नॉर्वेच्या रिन्सन जोसची आहे. मात्र एका दिवसानंतर शुक्रवारी DANS ने सांगितले की लेबनॉनमध्ये झालेल्या स्फोटातील पेजर बल्गेरियामध्ये आयात, निर्यात केलेले किंवा निर्माण केलेले नव्हते.

कोन आहे रिन्सन जोस (Who is Rinson Jose)

वृत्तसंस्था आयएएनएसच्या रिपोर्टनुसारस जोस काही वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी नॉर्वेला आला होता. त्याने काही काळासाठी लंडन येथे देखील काम केले आहे, एएफपी च्या रिपोर्टनुसार त्याच्या लिंक्डइन पेजवरील माहितीमधून समोर आले आहे की त्याने नॉर्वेजियन प्रेस समूह डीएन मीडियासाठी डिजिटल कस्टमर सपोर्टमध्ये तब्बल पाच वर्ष काम केले आहे. डीएन मीडियाने वृत्तपत्र वर्डेंस गँगला सांगितले की तो मंगळवारपासून कामानिमीत्त परदेशात आहे आणि त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

जोस याच्या ३७ वर्षीय एका नातेवाईकाने शुक्रवारी एका वत्तसंस्थेला सांगितले की जोस हा त्याच्या पत्नीसोबत ओस्लो येथे राहतो आणि त्याचा एक जुळा भाऊ लंडनमध्ये राहतो. त्याच्याशी दररोज फोन वर बोलणे होते. पण मागील तीन दिवसांपासून आमचा जोस याच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही. तो सरळ साधा माणूस आहे आणि आम्ही त्यात्यावर पूर्ण विश्वास करतो. तो कोणत्याही चुकीच्या कामात गुंतलेला नसेल, तो या स्फोटांमध्ये अडकल्याची शक्यता आहे, तसेच त्यांनी सांगितलं की ते जोसच्या पत्नीशी देखील संपर्क करू शकत नाहीयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT