Sheikh Hasina eSakal
ग्लोबल

Sheikh Hasina: कोण आहेत बांग्लादेशच्या शेख हसीना? वडिलांची राष्ट्रपती भवनात घुसून करण्यात आली होती हत्या !

Who is Sheikh Hasina Bangladesh Prime Minister?: शेख हसीना यांनी आपल्या आयुष्यात खूप रक्तपात पाहिला आहे. बांगलादेश मुक्तीसंग्रामादरम्यान त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या तीन भावांची हत्या करण्यात आली होती.

कार्तिक पुजारी

ढाका- बांगलादेशमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेश स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून देशात मोठा हिंसाचार घडून येत आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला आहे.

शेख हसीना या आवामी लीगच्या प्रमुख आहेत. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे हसीना यांच्या पक्षाचा सहज विजय झाला. शेख हसीना या भारताच्या चांगल्या मित्र म्हणून ओळखल्या जातात. शेख हसीना यांनी आपल्या आयुष्यात खूप रक्तपात पाहिला आहे. बांगलादेश मु्क्तीसंग्रामादरम्यान त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या तीन भावांची हत्या करण्यात आली होती.

१९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली. यात शेख मुजीबूर रेहमान यांचा महत्त्वाचा हात होता. त्यांनाच बांगलादेशचा संस्थापक म्हटलं जातं. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबूर रेहमान यांची चांगली मैत्री होती. शेख मुजीबूर रेहमान हे १९७१ मध्ये बांगलादेशचे राष्ट्रपती झाले. पण, त्यांच्या काळात बांगलादेशमध्ये एक सशस्त्र मार्क्सवादी आंदोलन जोर धरू लागलं होतं. यामध्ये लष्कराच्या काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.

१५ ऑगस्ट १९७५ मध्ये बांगलादेशच्या काही लष्करी अधिकाऱ्यांनी टँक घेऊन राष्ट्रपती भवनावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मुजीबूर यांचे कुटुंब आणि सुरक्षा रक्षक मारले गेले होते. त्यांच्या दोन मुली शेख हसीना आणि शेख रेहाना यांचा जीव वाचला होता. कारण, त्या त्यावेळी जर्मनीमध्ये होत्या. मुजीबूर यांच्या हत्येनंतर शेख हसीना यांना बांगदेशमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती. १९७७ मध्ये लष्कराचे जनरल जियाउर्रहमान हे देशाचे राष्ट्रपती झाले.

कोण आहेत शेख हसीना?

शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ मध्ये झाला आहे. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या त्या कन्या आहेत. त्या विद्यार्थीदशेत असतानात त्यांनी राजकारणात पाय ठेवला. पुढे त्यांनी आवामी लीगच्या विद्यार्थी विंगचे काम सांभाळले. १९७५ मध्ये लष्कराने बंडखोरी केली होती. लष्कराने हसीना यांच्या कुटुंबाविरोधात मोर्चा उघडला होता. यात लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी हसीना यांचे आई-वडील आणि ३ भावांची हत्या केली.

आई-वडिलांच्या हत्येनंतर शेख हसीना या काहीकाळ जर्मनीमध्ये राहिल्या. त्यानंतर त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आश्रय दिला. त्या जवळपास ६ वर्ष भारतात राहिल्या. निर्वासिताचे आय़ुष्य जगल्यानंतर त्या १९८१ मध्ये बांगलादेशमध्ये परत गेल्या. यावेळी बांगलादेशमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी वडिलांचा आवामी लीग पक्ष पुढे चालवण्याचं काम केलं. त्यांनी १९८६ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. १९९६ मध्ये त्या बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT