Wagner Group Russia Putin eSakal
ग्लोबल

Wagner Group : पुतीन यांचा शेफ ते भाडोत्री सैन्याचा लीडर! कोण आहे रशियाच्या अध्यक्षांना चॅलेंज देणारा येवगेनी प्रिगोझिन?

येवगेनी हे नाव ऐकताच रशियाची काळी बाजू समोर येते.

Sudesh

गेल्या दीड वर्षापासून युक्रेनशी लढत असलेल्या रशियासमोर आता एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. रशियाने नेमलेल्या खासगी सैनिकांच्या एका ग्रुपने त्यांच्याविरोधातच बंड पुकारलं आहे. त्यामुळे रशियात आता अंतर्गत युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युक्रेनविरुद्ध रशियाशी लढणाऱ्या वॅगनर ग्रुपने बंड पुकारलं आहे. एवढंच नाही, तर रशियातील पुतीन सरकारविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलं आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून या ग्रुपचा प्रमुख असणाऱ्या येवगेनी प्रिगोझिन याला अटक करण्याचा आदेश रशियाने दिला आहे. सोबतच, रशियाने अँटी टेररिस्ट ऑपरेशन रेजिमेची घोषणा केली आहे. मात्र, या सगळ्याला कारणीभूत ठरलेला येवगेनी (Yevgeny Prigozhin) आहे तरी कोण?

येवगेनी हे नाव ऐकताच रशियाची काळी बाजू समोर येते. असं म्हटलं जातं, की रशियाचं सरकार अधिकृतरित्या जे करू शकत नाही, ते अनधिकृतपणे येवगेनीकडून करून घेतं. येवगेनी हा केवळ वॅगनर ग्रुपचा प्रमुख नाही, तर एक मोठा उद्योजकही आहे. जगभरातील लोकशाही आणि स्थिरतेला धोका निर्माण करण्याची ताकद येवगेनीच्या हातात आहे. (Who is Yevgeny Prigozhin)

पुतीन यांचा शेफ

सोव्हिएत संघ जेव्हा बरखास्त झाला, तेव्हा येवगेनी हा सुमारे दहा वर्ष तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने एक हॉट-डॉग स्टँड उभारला. याच्या माध्यमातून त्याने पुढे प्रगती करत एक मोठं हॉटेल उभारलं. शून्यातून मोठं हॉटेल उघडल्यामुळे पुतीन यांची नजर येवगेनीवर पडली. त्यानंतर पुतीन यांनी येवगेनींच्या हॉटेल आणि केटरिंग कंपन्यांना मोठमोठी कंत्राटं दिली होती. यामुळेच, येवगेनी यांना पुतीन यांचा शेफ असंही म्हटलं जातं.

पुढे पुतीन यांच्या मेहेरबानीमुळे येवगेनीला मोठमोठी सरकारी कंत्राटं मिळाली. येवगेनी हा पुतीन यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे.

वॅगनारचा प्रमुख

यानंतर येवगेनी याने २०१४ मध्ये एक खासगी सैनिकांचा ग्रुप स्थापन केला. या समूहाला PMC वॅगनर म्हणून ओळखलं जातं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपमध्ये लाखो सैनिक आहेत. रशिया सरकारशी या ग्रुपने करार केला आहे. ज्यामुळे, कोणत्याही युद्धात हा ग्रुप रशियाच्या बाजूने सहभागी होतो. माजी रशियन अधिकारी दिमित्री उतकिन यांच्यासोबत मिळून येवगेनीने ही संघटना उभारली.

विशेष म्हणजे ही संघटना पूर्वी गुप्तपणे आपलं काम करत. या संघटनेमध्ये रशियातील दिग्गज सैनिकही सहभागी होते. २०१५ नंतर सीरिया, लिबिया, आफ्रिका आणि मध्य-पूर्व आशिया अशा ठिकाणी हा ग्रुप कार्यरत होता. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकने आपल्या हिऱ्यांच्या सुरक्षेसाठी देखील वॅगनर ग्रुपला कंत्राट दिलं होतं.

इंटरनेट रिसर्च एजन्सी

इंटरनेट रिसर्च एजन्सी (IRA) ही संस्था उभारण्यामागेही येवगेनी याचा हात असल्याचं म्हटलं जातं. ही एक ट्रोलिंग फर्म आहे. २०१६ साली अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये या फर्मने बराच हस्तक्षेप केला असल्याचा आरोप आहे. सध्या अमेरिकतील संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पुतीन मोठ्या संकटात?

ब्रिटनने दिलेल्या माहितीनुसार, सध्या रशियाने युक्रेनवर मिळवलेला ताबा हा वॅगनर ग्रुपचं यश होतं. युक्रेनमध्ये सध्या वॅगनार ग्रुपचे ५० हजारांहून अधिक सदस्य असल्याचंही ब्रिटनने म्हटलं आहे. आता याच ग्रुपने बंडखोरी केल्यामुळे पुतीन मोठ्या संकटात पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT