ग्लोबल

काबूल विमानतळावर कोण येऊ शकतं? अमेरिकेने जाहिर केली नियमावली

विनायक होगाडे

काबूल: अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. तालिबानने हा ताबा मिळवल्यानंतर तिथे अभूतपूर्व असा गोंधळ पहायला मिळाला. भीतीपोटी अनेक जण विमानतळावरुन देशाबाहेर पळून जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. या दरम्यान अनेकांचा मृत्यू देखील झाला. मात्र, आता या विमानतळावरील गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी आणि लोकांचं स्थलांतर सुव्यवस्थितपणे होण्यासाठी काबुलमधील अमेरिकन दूतावासाने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कुणाला येता येईल? याचा तपशील जारी केलाय. त्याचसोबत पुढील सूचना मिळेतपर्यंत विमानतळावर न जाण्याचं आवाहन देखील यावेळी अमेरिकन दूतावासाने केलंय.

काय म्हटलंय दुतावासाने?

  • आपण जर अमेरिकेचे नागरिक असाल, अमेरिकन कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी, स्थलांतरित व्हिसा अर्जदार किंवा अमेरिकन सरकारशी निगडीत असाल आणि आपल्याला हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करण्यासाठी विशिष्ट सूचना मिळाल्या असतील तर तुम्हाला दिल्या गेलेल्या सूचनांचं पालन करा.

  • जर तुम्ही SIV किंवा P1/P२ प्रक्रिया सुरू केली असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी सूचना दिल्या जातील. या प्रक्रियेला अधिक मोठा कालावधी लागू शकतो.

  • जर आपण वरील निकषांचा भाग नसाल. मात्र, अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्नात असाल तर सूचना मिळेपर्यंत कृपया हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊ नका.

  • जर तुमच्याकडे व्हेरीफाईड इन्व्हिटेशन नसेल, तर तुम्हाला विमानतळावर किंवा निर्वासितांच्या विमानामध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

सैन्य माघारीचा निर्णय तर्कसंगतच - ज्यो बायडेन

अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय हा तर्कसंगत आणि योग्य होता, असा दावा आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केला आहे. अमेरिकेने सैन्य परत बोलावल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानने धुमाकूळ घातला असून या घरवापसीवर जगभरातून टीका केली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानने अफगाणिस्तानात धुमाकूळ घातला आहे. १५ ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर देशात अराजकता निर्माण झाली. गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात ठाण मांडून बसलेल्या अमेरिकी सैनिकांनी दोन आठवड्यापूर्वी सैन्य माघारीला सुरवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT