नवी दिल्ली - जागतीक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या संचालकांनी रविवारी सदस्य राष्ट्रांना मंकीपॉक्सचा (Monkeypox) सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर मंकीपॉक्सच्या उद्रेकाला आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जगभरात मंकीपॉक्सचा विषाणू खूप वेगाने पसरत आहे. (Monkeypox news in Marathi)
ज्या देशांमध्ये यापूर्वी कधीही संसर्ग झाला नव्हता अशा देशांमध्येही व्हायरसने पाय पसरले आहेत. ही सर्वात चिंताजनक बाब असल्याचं संस्थेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितलं. डॉ. खेत्रपाल पुढं म्हणाल्या की, "व्हायरसच्या संसर्गाचा धोका समलैंगिक लोकांना आहे. मात्र भविष्यात तो इतर लोकांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. केवळ समलैंगिक लोकांपुरतात मर्यादित राहिल असं गृहित धरू नये.
आतापर्यंत जगातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची 16,000 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दक्षिण पूर्व आशिया रेंजमध्ये आतापर्यंत चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी तीन भारतातील आणि एक थायलंडचा आहे.
भारतात संसर्ग झालेले लोक हे मध्य पूर्व देशातून परतलेले आहेत. मंकीपॉक्स रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, याला रोखण्यासाठी एकजुटीने प्रयत्न व्हायला हवे. तसेच उपाययोजना संवेदनशिलपणे आणि भेदभावमुक्त असाव्या, असंही डॉ. खेत्रपाल यांनी नमूद केलं.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी सांगितले की 70 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक ही आणीबाणीची स्थिती आहे. मंकीपॉक्स संक्रमित प्राण्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे हा व्हायरस मानवांमध्ये पसरतो. मंकीपॉक्सचा संसर्ग संक्रमित त्वचेच्या संपर्कात आल्याने आणि श्वास सोडताना नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणारे छोटे थेंब याद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.