Suella Braverman esakal
ग्लोबल

भारतीय वंशाच्या Suella Braverman कोण आहेत? त्यांना ऋषी सुनक यांनी दिलीय मोठी जबाबदारी!

ऋषी सुनक हे नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ऋषी सुनक हे नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.

ऋषी सुनक (Rishi Sunak) हे नुकतेच ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान झाले आहेत. भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांनाही त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलंय. सुएला ब्रेव्हरमन यांना ब्रिटनचे गृहसचिव बनवण्यात आलंय. 42 वर्षीय सुएला ब्रेव्हरमन या लिझ ट्रस यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. मात्र, त्यांनी नंतर राजीनामा दिला. त्यानंतर आता सुनक यांनी ब्रेव्हरमन यांना पुन्हा होम सेक्रेटरी बनवलंय.

कोण आहेत सुएला ब्रेव्हरमन?

42 वर्षीय सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या राजकारणात सक्रिय आहेत. 2015 पासून त्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्या आहेत. त्यांनी 2020 ते 2022 पर्यंत बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अॅटर्नी-जनरल म्हणून काम केलं आहे. 1980 मध्ये जन्मलेल्या सुएला यांना दोन मुली आहेत. त्यांची आई उमा यांचा जन्म मॉरिशसमधील हिंदू तामिळ कुटुंबात झाला होता, तर वडील क्रिस्टी फर्नांडिस गोव्यातील होते.

ब्रेव्हरमन यांची राजकीय कारकीर्द 2005 मध्ये सुरू झाली. जेव्हा त्यांनी लिसेस्टर पूर्वमधून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. 2015 मध्ये निवडणूक जिंकून ब्रेव्हरमन यांनी फरेहमसाठी कंझर्वेटिव्ह खासदार म्हणून पदभार स्वीकारला. 2017 आणि 2019 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. सुएला ब्रेव्हरमन ह्या त्रिरत्न बौद्ध समुदायाच्या सक्रिय सदस्य देखील आहेत.

सुएला यांनी का राजीनामा दिला?

सुएला ब्रेव्हरमन या तत्कालीन लिझ ट्रस सरकारमध्ये गृहमंत्री होत्या. लिझ ट्रस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT