Why Are Parents in South Korea Locking Themselves in Tiny Rooms  
ग्लोबल

धक्कादायक! साउथ कोरियामध्ये आई-वडिल स्वतःला घेतायत कोंडून; काय आहे कारण?

आई वडिलांना एकटे रहावे लागत आहे. त्यांना एक रिकामी खोली दिली जात आणि दाराच्या छोट्या फटितुनच त्यांना अन्न दिले जाते.

सकाळ डिजिटल टीम

साऊथ कोरियामधुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेथिल आई-वडिल स्वतःला घरामध्ये बंद करुन घेत असल्याची घटना समोर आली आहे. जगभरात या घटनेची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नेमंक असं काय घडलं? तेथिल आई वडिलांवर अशी का परिस्थिती आली? असे अनेक सवाल केले जात आहेत.

अनेकांना ही गोष्ट अजब वाटत आहे. कारण काही हट्टी मुलं असा प्रकार करतात. एखाद्या मुलाला हवी ती वस्तु घेऊन दिली नाही तर ते मुलं स्वतः रुममध्ये कोंडून घेतं. या अशा घटना आपण फार जवळून पाहिल्या आहेत. पण इथे आई वडिलचं स्वतः कोंडून घेतलेत. असा आई वडिलांचा कोणता हट्ट आहे असा सवालही काही लोक करताना दिसत आहे. तर नेमकं काय प्रकरण जाणून घेऊ.

पालक आपल्या मुलांच्या समस्या समजून घेण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबत आहेत. 'हॅपीनेस फॅक्टरी' नावाची एक जागा आहे, जिथे पालक तीन दिवस स्वतःला एका खोलीत बंद करतात.

हे करण्यामागचा उद्देश हा आहे की, त्यांना त्यांच्या मुलांप्रमाणेच एकटेपणा, तणाव आणि चिंता याची जाणीव होईल. ज्याचा सामना आजकाल अनेक तरुण एकटे राहण्यामुळे करत आहेत. या अनुभवामुळे पालक आपल्या मुलांचे जग चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि त्यांना मदत करू शकतील.

स्वतःच्या पाल्याला समजुन घेण्यासाठी हा हट्टाहास

तेथील काही तरुण वर्ग समाजापासून दुरावला आहे. काही तरुण स्वतःला दिवसभर एका खोलीत कोंडून घेत आहेत. कोणाशीही संवाद साधत नाही. त्यामुळे तेथिल पालकांनी त्यांच्या मुलांची ही समस्या समजून घेण्यासाठी एक विशेष कार्यक्रम सुरु केला आहे.

या कार्यक्रमाला "आयसोलेटेड युवा पालक शिक्षण कार्यक्रम" असे म्हणतात. हा कार्यक्रम 13 आठवडे चालतो आणि "ब्लू व्हेल रिकव्हरी सेंटर" आणि "कोरिया युथ फाउंडेशन" द्वारे संयुक्तपणे चालवला जातो.

आई-वडिल स्वतःला घेतायत कोंडून

या कार्यक्रमात पालकांनाही काही काळ एकटे राहावे लागते. त्यांना एक रिकामी खोली दिली जाते, जिथे काहीही सजवलेले नाही किंवा त्यांना फोन किंवा लॅपटॉपसारखे कोणतेही उपकरण वापरण्याची परवानगी नाही. दाराच्या छोट्या फटितुनच त्यांना अन्न दिले जाते.

पालकांच्या मदतीसाठी, "हॅपिनेस फॅक्टरी" मध्ये मानसिक आरोग्यावर चर्चा देखील आयोजित केली जाते. यावेळी कुटुंब, पालक आणि मुले यांच्यातील नातेसंबंध आणि जगाशी संबंध यासारख्या विषयांबद्दल चर्चा होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही पालकांचे म्हणणे आहे की आता त्यांना त्यांच्या मुलांच्या समस्या, म्हणजे एकटेपणा आणि अस्वस्थता समजून घेणे सोपे झाले आहे.

एका आईने बीबीसा कोरियाशी संवाद साधला. जीओन यंग असं त्यांचे नाव असून त्या 50 वर्षाच्या आहेत. तिच्या मुलाने गेल्या तीन वर्षांपासून स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून ठेवले आहे. कॉलेजमधून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो त्याच्या खोलीत कोंडून राहतो, त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही जेवतही नाही. अशी खंत जीओन यंग यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच त्यांनी माझे मनं तुटलं आहे. तीन दिवस स्वत:ला मी खोलीत कोंडून घेतल्यानंतर आणि इतर एकाकी तरुणांच्या डायरी वाचल्यानंतर 24 वर्षाच्या मुलाच्या भावना मी समजू शकले. मला जाणवले की तो स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गप्प बसतो कारण त्याला वाटते की त्याला कोणीही समजून घेत नाही. अशी भावना जीओम यंग यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT