Nobel Peace Price esakal
ग्लोबल

Nobel Peace Prize: महात्मा गांधींना 'नोबेल' का नाही? 5 वेळा होतं नामांकन

जगभरामध्ये नोबेल पुरस्काराचे काय महत्व आहे हे काही वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही. सध्या नोबेल पुरस्काराची घोषणा सुरु झालीय.

सकाळ डिजिटल टीम

Mahatma Gandhi Nobel Peace Price: जगभरामध्ये नोबेल पुरस्काराचे काय महत्व आहे हे काही वेगळेपणानं सांगण्याची गरज नाही. सध्या नोबेल पुरस्काराची घोषणा सुरु झालीय. आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. यासगळ्यात एका नावानं पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाची. भारतीय स्वातंत्र्यलढयात गांधीजींचे स्थान असाधारण आहे. साऱ्या जगानं त्यांचे मोठेपण मान्य केले. त्यांचे कौतूक केले. त्यांच्या विचारांचा जयजयकार केला. त्याला मोठ्या आदरानं स्विकारले. असे असताना शांततेचं नोबेल गांधीजींना का नाकारण्यात आला, असा प्रश्न नोबेल पुरस्काराच्या निमित्तानं अनेकदा विचारला जातो.

यावेळचा शांततेचा नोबेल बेलारूसमधील मानवाधिकार अधिवक्ता अॅलेस बिलियात्स्की तसेच रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना जाहीर झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. (Nobel Peace Prize 2022 Human Rights Activist Ales Bialitsky Announced Nobel Peace Prize)

असं म्हटलं जातं की, गांधीजी हे तब्बल पाचवेळा नोबेलसाठी नामांकित झाले होते. त्यात 1937, 1938. 1939 तसेच 1947 आणि 1948 या वर्षांचा समावेश होता. 1948 मध्ये गांधीजींना नोबेल मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. त्यांचे नाव संभाव्य पुरस्कारांच्या यादीत होते. मात्र त्याचवेळी त्यांची हत्या झाली. आणि त्यांना पुन्हा एकदा त्या पुरस्कारापासून वंचित राहावं लागल्याचे दिसून आले. यावेळी नोबेल समितीनं आपल्याला गांधीजींना हा पुरस्कार देता आला नाही. याची खंत वाटते असे म्हटले होते. त्यामुळे त्या वर्षी शांततेचं नोबेल कुणालाच न देण्याचा निर्णय घेतला होता.

* कुणी केली आडकाठी?

नोबेलसाठी अनेकदा नोबेलचे नॉमिनेशन झाले होते. मात्र त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही. ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा त्यांचे नॉमिनेशन झाले तेव्हा अॅडव्हायजर प्रोफेसर जेकब वॉर्म मुलर यांनी आडकाठी केली होती. त्यावेळी भलेही गांधींना प्रभावी नेतृत्व असे म्हटले होते. मात्र आपल्या विचार आणि धोरणांमध्ये वेगानं बदल करणारे नेते असेही म्हटले होते. याचा परिणाम म्हणजे गांधींना नोबेल मिळाले नव्हते. आफ्रिकेमध्ये गांधीजींचा संघर्ष हा केवळ भारतीयांसाठीच होता तो आफ्रिकन लोकांसाठी नव्हता असे मुलर यांनी आपल्या अहवालात म्हटले होते.

1947 मध्ये गांधीजी पुन्हा नोबेलसाठी पुन्हा नॉमिनेट झाले होते. यावेळी त्यांचे नाव बीजी खेर, जी वी मावळकर आणि जी बी पंत यांनी नॉमिनेट केले होते. मात्र त्यावेळी अचानक या समितीची विभागणी झाली. त्या समितीचे दोन सदस्य हे गांधीजींच्या बाजुनं होते. तर तीन सदस्य विरोधात होते. पंजाब फाळणी, दंगल आणि त्यावरुन झालेला हिंसाचार याचा परिणाम यामुळे अनेक सदस्य गांधीजींच्या विरोधात असल्याचे म्हटले जाते.

* मरणोत्तर पुरस्कार दिला गेला नाही...

1948 मध्ये जेव्हा नोबेल शांती पुरस्काराचे नॉमिनेशन हे त्यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी बंद झाले होते. समिती ही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मरणोत्तर पुरस्कार प्रदान करते. मात्र गांधीजी हे कोणत्याही संघटनेशी संबंधित नव्हते. तसेच त्यांनी आपल्या पश्चात कोणतेही वारसहक्क आणि संपत्ती सोडली नाही. त्यामुळे पुरस्काराची रक्कम कुणाला द्यायची हे ठरवणे अवघड होते. त्यावेळी कमिटीचे वकील ओले टॉरलीफ यांनी पुरस्कार देणाऱ्या कमिटीचा सल्ला घेतला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की, मरणोत्तर पुरस्कार दिला जाऊ नये....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT