vaccin. 
ग्लोबल

ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनबाबत का उपस्थित केली जातेय शंका?

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये व्हॅक्सिनवर संशोधन केलं जात आहेत. दरम्यान, काही व्हॅक्सिन ट्रायलमध्ये यशस्वी झाल्याचंही समोर आलं आहे. यात ऑक्सफर्ड आ णि एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनचाही समावेश आहे. ही व्हॅक्सिन 70 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र व्हॅक्सिनच्या ट्रायलची आकडेवारी ज्या पद्धतीने सादर केली गेली त्यामुळे शंका व्यक्त केली जात आहे. 

कोरोनावर मात करण्यासाठी या व्हॅक्सिनवर अनेक विकसनशील देश अवलंबून आहेत. याच्या ट्रायलमध्ये दोन वेगवेगळे डोस देण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या एका गटाला एकसारखा डोस एक महिन्याच्या अंतराने दिला होता. तर दुसऱ्या गटाला एक अर्धा डोस आणि एक पूर्ण डोस दिला होता. पहिल्या आणि मोठ्या गटातील आकडेवारीनुसार व्हॅक्सिन 62 टक्के प्रभावी ठरले तर दुसऱ्या लहान गटावर करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये हेच प्रमाण 90 टक्के इतकं होतं. 

अमेरिकेतील ऑपरेशन वार्प सीडचे प्रमुख मोन्सेफ स्लाओई यांनी मंगळवारी खुलासा केला की, दुसऱ्या गटामध्ये फक्त 55 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे लोक होते.अशा लोकांमध्ये कोरोनाच्या गंभीर प्रभावाचा धोका कमी असतो. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझोनकाने व्हॅक्सिनच्या प्रभावाची माहिती देताना वयाबाबत सविस्तर सांगितले नव्हते.

ज्योफ्री बोर्जेस नावाच्या विश्लेषकांनी सांगितलं की, त्यांना वाटतं की एस्ट्रा जेनकाच्या व्हॅक्सिनला अमेरिकेत परवानगी मिळणार नाही. कंपनीने त्यांच्या निष्कर्षांमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला असल्याचा धावा त्यांनी केला. त्यांनी अभ्यासामध्ये लहान गटावर झालेल्या ट्रायलमध्ये व्हॅक्सिन किती प्रभावी ठरली हे सांगितलं आहे.

फायजर, मॉडर्नाची लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोन लशींचा डेटा समोर आल्यानंतर ऑक्सफर्डच्या लशीच्या ट्रायलचे निष्कर्ष आले होते. त्यामध्ये लस 70 टक्के प्रभावी ठरल्याचं ऑक्सफर्डने म्हटलं होतं. याशिवाय जगभरातून संशय व्यक्त करण्यात आलेल्या रशियाच्या स्पुतनिक लशीचा डेटाही जाहीर करण्यात आला आहे .त्यानुसार स्पुतनिक V लस 91 टक्के प्रभावी ठरली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT