Why have the Houthis attacked Red Sea ships Who are the Houthi rebels 
ग्लोबल

Explainer: हूथी बंडखोर कोण आहेत? लाल समुद्रात ते हल्ले का करताहेत?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लाल समुद्रात येमनच्या हूथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या शिपिंग कंपन्यांनी लाल समुद्राचा मार्ग टाळून इतर मार्ग धुंडाळायला सुरुवात केलीये. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर पडत असून जगभरात महागाईचा भडका उडण्याची देखील शक्यता आहे. (Why have the Houthis attacked Red Sea ships Who are the Houthi rebels)

लाल समुद्र हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. युरोप आणि आशियाला जोडणारा हा व्यवहार्य सागरी मार्ग आहे. पण, या सागरी मार्गावर हूथी गटाची दहशत निर्माण होत असल्याचं दिसतंय. हा मार्ग सोडला तर जहाजांना आफ्रिका खंडाच्या केप ऑफ गूड होपला वळसा मारुन आशिया किंवा यूरोपमध्ये जावं लागतं.

हा मार्ग दूरचा असल्याने तो खर्चिक आहे. शिवाय १० ते १५ दिवसांचा कालावधी देखील जास्त लागतो. त्यामुळे जागतिक महागाई वाढण्यास हे कारणीभूत ठरु शकतं. जगभरातला १५ ते २० टक्के व्यापार हा लाल समुद्रातून होतो.

हूथी लाल समुद्रातील जहाजांवर का हल्ला करत आहेत?

७ ऑक्टोंबरला इस्राइल आणि हमास युद्धाला सुरुवात झाली. तेव्हापासून हूथीने हे हल्ले सुरु केले आहेत. हूथीने जाहीर केलंय की हमासच्या समर्थनार्थ इस्राइलकडे येणाऱ्या जहाजांवर हल्ले केले जातील. नोव्हेंबर महिन्यात हूथींनी एक इस्राइली जहाजावर हल्ला केला होता. ७ ऑक्टोंबरपासून १५ मिसाईल किंवा ड्रोन हल्ले हूथींनी लाल समुद्रात केली आहेत. त्यानंतर अमेरिकेने या भागात युद्दपोत तैनात केले आहेत. त्यांच्या या कामात यूके, कॅनडा, फ्रान्स, बहारिन, नॉर्वे, स्पेन यांनीही अमेरिकेला साथ दिलीये.

हूथी बंडखोर कोण आहेत?

हूथी हा येमनमधील एक सशस्त्र गट आहे. येमनच्या मोठ्या भूभागांवर त्यांचा ताबा आहे. शिया मुस्लिमांचा हा गट असून त्याला इराणचा पूर्ण पाठिंबा आहे. या संघटनेची स्थापना १९९० मध्ये तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी करण्यात आली होती. संघटनेची स्थापना हुसैन अल हूथी यांनी केली होती. त्यांच्या नावावरुन संघटनेला हूथी नाव पडले आहे. येमन सरकारला सौदी अरेबिया, युएई अशा अरब देशांचा पाठिंबा आहे, तर हूथींना इराणचा पाठिंबा आहे. या दोन्ही गटात गेल्या २ दशकांपासून नागरी युद्ध सुरु आहे.

इराण हूथींना मदत का करतंय?

हूथी हा शिया मुस्लिमांचा गट असून त्यांना हिजबोला यांच्याकडून लष्करी मदत मिळत आहे. इराण हाही शिया मुस्लिमांचा देश आहे. सुन्नी असलेला सौदी अरेबिया हा दोघांचा सामाईक शत्रू आहे. अमेरिका, इस्राइल हे देखील दोघांचे सामाईक शत्रू आहेत. सौदी अरेबियावर मिसाईल हल्ल्यासाठी इराणनेच हूथींना शस्त्र पुरवल्याचं सांगितलं जातं.

माहितीनुसार, येमनचे सरकार सौदीच्या रियाधमधून चालते. येमनमधील बहुतांश लोक हूथींच्या नियंत्रणाखाली आहेत. लाल समुद्राचा किनारी भाग पूर्णपणे हूथींच्या ताब्यात आहे. हूथी लोकांकडून कर गोळा करतात, तसेच नोटा देखील छापतात. यूएनच्या सुरक्षा काऊन्सिलच्या माहितीनुसार, २०१० मध्ये हूथींचे १ लाख ते १.२० लाख समर्थक होते. यातील अनेकजण सशस्त्र बंडात सहभागी आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी, मगच..; काय म्हणाले महाडिक?

Navratri 2024 : वरीचा भात, खिडचीची चव वाढवेल उपवासाची दाण्याची आमटी, रेसिपी पण लगेचच होणारी

MSRTC : तुळजापूरसाठी राज्यभरातून १ हजार २६५ बस, महामंडळाचे नियोजन; लालपरी सज्ज

SCROLL FOR NEXT