people locking graves of women in pakistan  google
ग्लोबल

Pakistan Crime : स्मशानातील कबरींमधून महिलांचे मृतदेह आपोआप बाहेर येताना का दिसत आहेत ?

जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता, तेव्हा तो तुमच्या पाठोपाठ कबरीपर्यंत जातो

नमिता धुरी

मुंबई : पाकिस्तानमधील नागरिक सध्या आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या कबरी टाळेबंद कपाटात ठेवत आहेत. सध्या नेक्रोफेलियाची प्रकरणे वाढत असल्याने असे केले जात आहे.

पाकिस्तानमध्ये याआधीही नेक्रोफिलियाची प्रकरणे नोंदवली गेली असताना, कार्यकर्ते आणि लेखकांसह काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला.

एक माजी मुस्लिम नास्तिक कार्यकर्ता आणि “द कर्स ऑफ गॉड, मी इस्लाम का सोडला” या पुस्तकाचे लेखक हॅरिस सुलतान यांनी अशा विकृत कृत्यांसाठी कट्टर इस्लामी विचारसरणीला जबाबदार धरले आहे. (why people locking graves of women in pakistan necrophilia cases rape on dead women )

“पाकिस्तानने असा लैंगिकदृष्ट्या निराश समाज निर्माण केला आहे की लोक आता आपल्या मुलींवर बलात्कार होऊ नयेत म्हणून त्यांच्या कबरीवर टाळे लावत आहेत. जेव्हा तुम्ही बुरख्याचा संबंध बलात्काराशी जोडता, तेव्हा तो तुमच्या पाठोपाठ कबरीपर्यंत जातो,” असे ट्विट बुधवारी सुलतान यांनी केले.

आणखी एक ट्विटर वापरकर्ता साजिद युसुफ शाह यांनी लिहिले : “पाकिस्तानने निर्माण केलेल्या सामाजिक वातावरणामुळे लैंगिक आरोप आणि दडपशाहीचा समाज निर्माण झाला आहे, जिथे काही लोकांनी लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या मुलीच्या कबरीला कुलूप लावले आहे. बलात्कार आणि एखाद्या व्यक्तीच्या कपड्यांमधील असा संबंध केवळ दुःख आणि निराशेने भरलेल्या मार्गाकडे नेतो. ”

यापूर्वीही अनेक वेळा महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्यांची विटंबना करण्यात आली आहे.

२०११ मध्ये पाकिस्तानमधील सर्वात भयानक नेक्रोफिलिया प्रकरण नोंदवले गेले होते जेव्हा उत्तर नाझिमाबाद, कराची येथील मुहम्मद रिजवान नावाच्या कबरीपालाला ४८ महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केल्याची कबुली दिल्यानंतर अटक करण्यात आली होती.

मृतदेहाची विटंबना करून पळताना रिझवानला पकडण्यात आले. त्याने जवळील कबर खोदणारे आणि इतर काही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

अगदी अलीकडे मे २०२२ मध्ये, काही अज्ञात पुरुषांनी पाकिस्तानातील गुजरातमधील चक कमला गावात एका किशोरवयीन मुलीचे प्रेत खोदून तिच्यावर बलात्कार केला. ज्या रात्री कुटुंबाने मृताचे दफन केले त्याच रात्री हा प्रकार घडला.

वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी मृत मुलीचे नातेवाईक त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार स्मशानात गेले तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतदेह खोदलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळला. शरीरावर बलात्काराच्या खुणा होत्या.

२०२१ मध्ये, काही अज्ञात व्यक्तींनी किनारी शहर गुलामुल्लाजवळील मौलवी अश्रफ चंडियो गावात असेच रानटी कृत्य केले होते.

२०२० मध्ये, २८ फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीला पाकिस्तानातील पंजाबमधील स्मशानभूमीत एका महिलेच्या प्रेतावर बलात्कार करताना रंगेहात पकडले गेले. पंजाब प्रांतातील ओकारा शहरात ही घटना घडली. आरोपीची ओळख अश्रफ या नावाने झाली.

२०१९ मध्ये, कराचीच्या लांधी टाऊनमध्ये एका महिलेचा मृतदेह खोदून तिच्यावर अज्ञात पुरुषांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या महिलेला इस्माईल गोठ कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले.

महिलेचा मृतदेह पुरल्यानंतर एक दिवस खोदून काढण्यात आला. स्मशानभूमीच्या काळजीवाहकाने मृताच्या कुटुंबीयांना सांगितले की, एका कुत्र्याने कबरीला झाकणारा स्लॅब काढला होता.

२०१३ मध्ये, गुजरनवाला येथे एका १५ वर्षांच्या मुलीचा मृतदेह तिच्या कबरीबाहेर पडलेला आढळून आला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर पाकिस्तानातील पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी या घटनेच्या त्वरीत चौकशीचे आदेश दिले होते. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT