ग्लोबल

13 डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करणार; खलिस्तानी दहशतवादी पन्नुची पुन्हा भारताला धमकी

एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून भारताच्या संसदेवर १३ डिसेंबर किंवा त्याआधी हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- खलिस्तानी दहशतवादी आणि सिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारतावर आगपाखड केली आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून भारताच्या संसदेवर १३ डिसेंबर किंवा त्याआधी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे भारतीय एजेन्सी हायअलर्ट झाल्या आहेत. (Will attack Indian Parliament on or before December 13 Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun fresh threat)

१३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता. याच दिवशी किंवा याआधी पन्नूने संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये २००१ संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरु याचे पोस्टर आणि 'दिल्ली बनेगा खलिस्तान' शिर्षक वापरण्यात आले आहे.

भारतीय एजेन्सींनी मला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रयत्न फसला आहे. याचा बदला म्हणून १३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला केला जाईल, अशी धमकी पन्नूने दिली आहे. विशेष म्हणजे सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. १९ दिवस चालणारे अधिवेशन २२ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे सुरक्षा एजेन्सी अॅक्टिव मोडमध्ये गेल्या आहेत.

पन्नूला पाकिस्तान मदत करत असून त्यांच्याच मदतीने तो भारताला इशारा देत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी द फायनान्शियल टाईम्सने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली होती की, पन्नू याची हत्या करण्याचा भारतीय एजेन्सीचा प्रयत्न अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. पन्नू हा अमेरिकी नागरिक आहे. भारताने सिख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी आणलेली आहे.

पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. चेक गणराज्यमध्ये गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. गुप्ता यांना एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याने मदत केल्याचा देखील आरोप आहे. यासंबंधी माहिती समजताच भारताने तपासासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : मविआचा विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव का झाला? शरद पवार यांनी सांगितली 'ही' कारणं

Sharad Pawar: ''...म्हणून झारखंडची निवडणूक महाराष्ट्रासोबत घेतली'' शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या विजयामागचं गुपित

Latest Maharashtra News Updates : नवीन मंत्रिमंडळात दिसणार नवीन चेहरे- सूत्र

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: व्येंकटेश अय्यरव ठरला तिसरा महागडा खेळाडू! जाणून कोणाला किती बोली लागली

Daund Assembly Election 2024 Result : दौंड विधानसभा निवडणुकीत एकाच कुटुंबात विजयाच्या दोन हॅटट्रीक; कुल पिता-पुत्रांसाठी जनादेश

SCROLL FOR NEXT