Jaishankar_Wang Yin 
ग्लोबल

LACचा प्रश्न सुटणार का? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिली माहिती

जयशंकर यांनी बाली इथं G-20 बैठकीदरम्यान घेतली चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

सकाळ डिजिटल टीम

बाली : देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या बालीच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी २० देशांच्या (G-20) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान जयशंकर यांनी चीनने परराष्ट्र मंत्री वांग इन यांची गुरुवारी भेट झाली. तासभर चाललेल्या या बैठकीत त्यांच्यामध्ये भारत-चीन सीमेवरील स्थितीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. (Will issue of LAC Eastern Ladakh be solved Info given by EAM Jaishankar)

पूर्व लडाखमधील लाईन ऑफ अॅक्च्युअल कन्ट्रोलवरील (LAC) सध्याच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्रालयानं आपल्या निवदेनात दिली आहे.

जयशंकर म्हणाले, भारत-चीन संबंधांमध्ये तीन परस्पर संबंध महत्वाचे आहेत. यामध्ये परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्परांमधील रस या गोष्टी महत्वाच्या आहेत. सीमेवरील स्थितीबाबत द्वीपक्षीय संबंधांमध्ये सध्याचे ठराविक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचबरोबर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये विद्यार्थी आणि विमानसेवा तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत दोन्ही देशांना काय वाटत? याबाबतही द्विपक्षीय चर्चा झाली.

गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर बिजिंगकडून परस्पर संबंध रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीन यांनी यावर्षी मार्चमध्ये भारताला भेट दिली होती. पण या भेटीदरम्यान भारतानं चीनला ठणकावलं होतं की, जोपर्यंत सीमावाद सोडवला जात नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होऊ शकत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT