kabul google
ग्लोबल

महिलांचे स्वातंत्र्य : तालिबानी खरंच उदार, की मुखवटा?

भाग्यश्री राऊत

सध्या तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर (Taliban attack on Afghanistan) ताबा मिळविला आहे. तसेच अफगाण सैनिकांनी देखील तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडला. आता अफगाणिस्तानमध्ये २० वर्षानंतर परत तालिबान्यांचे सरकार स्थापन होणार आहे. २० वर्षांपूर्वी तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी (taliban rules for women) अत्यंत कठोर कायदे होते. पण, आता तालिबानने महिलांचे हक्क अबाधित राहतील, असा दावा केला आहे. तरीही या सरकारमध्ये २० वर्षांपूर्वी महिलांची स्थिती काय होती आणि आताही ती तशीच राहणार का? याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. आता तालिबान महिला स्वातंत्र्याबाबत खरंच उदार होणार की हा फक्त एक मुखवटा आहे? हे समजून घेऊया.

तालिबानची महिलांविषयी भूमिका जाणून घेण्यापूर्वी त्याचे कायदे नेमके काय होते, ते पाहुयात -

२० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं सरकार होतं. त्यावेळी तालिबानने महिलांसाठी शाळा बंद केल्या होत्या. महिलांना विद्यापीठांमध्ये किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे राजकारणातील महिला, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका अशा अनेक महिलांचे यापूर्वीच नुकसान झाले आहे. पण, आता देखील तीच परिस्थिती येणार आहे का? याबाबत या सर्व महिला भयभीत झाल्या आहेत.

गेल्या जुलै महिन्यात तालिबानी बंदुकधारकांनी कंधार आणि हेरात येथील दोन बँक शाखांमधील महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड केली होती. तसेच त्या महिलांना त्यांच्या घरी नेऊन परत कामावर येऊ नका, अशी धमकी दिली होती. त्यामुळे आता महिलांचे शिक्षण आणि कामाचे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

महिलांसाठी तालिबानी नियम काय होते?

  • काही अपवाद वगळता महिलांना बाहेर काम करण्याची परवानगी नाही.

  • महिलांना शाळेत जायची परवानगी नाही.

  • महिलांसाठी आरोग्यसेवा मर्यादीत होती. त्यांना कुठल्या पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्याची परवानगी नव्हती.

  • महिला फक्त विशेष बस वापरू शकत होत्या आणि त्यांना फक्त पुरुष नातेवाईकांसोबत टॅक्सीमध्ये प्रवास करण्याची परवानगी होती. कुटुंबातील व्यक्तीशिवाय आणि बुरखा न घालता महिला रस्त्यावर येऊ शकत नाही.

  • उंच टाचाची सँडल वापरायला परवानगी नाही. कारण पुरुषांना महिलांच्या चालण्याचा, तिच्या पावलांचा आवाज यायला नको.

  • महिला सार्वजनिक ठिकाणी बोलत असेल तर अज्ञात व्यक्तींना तिचा आवाज ऐकायला जाऊ नये.

  • रस्त्यावरून घरातील महिला दिसू नये म्हणून तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील सर्व खिडक्यांना महिला दिसणार नाही अशा रंगाने रंगविणे.

  • स्त्रियांना त्यांची छायाचित्रे काढणे, चित्रित करणे, वर्तमानपत्र, पुस्तके, स्टोअरमध्ये, घरी प्रदर्शित करण्यास मनाई आहे.

  • महिलांना त्यांच्या बाल्कनीमध्ये निघण्याची परवानगी नाही.

  • महिलांना रेडिओ, दूरदर्शन किंवा कोणत्याही सार्वजनिक मेळाव्यात दिसण्यास मनाई आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर मिळणारी शिक्षा -

तालिबानची सत्ता होती त्यावेळी महिलांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना तालिबानच्या धार्मिक पोलिसांकडून मारहाण केली जात होती. तालिबान्यांनी सार्वजनिक फाशीही दिली, चोरांचे हात कापले आणि व्यभिचाराचा आरोप असलेल्या महिलांवर दगडफेक केली.

महिलांविषयी तालिबानचा मुखवटा?

तालिबानच्या मूळ स्वभावानुसार आणि शरीयत कायद्यानुसार ते कट्टर भूमिका घेतील हे नक्की आहे. पण, महिलांबाबत निर्णय कधी घेतली? हे आताच सांगता येणार नाही. तालिबान्यांना आधी राजकीय सत्ता काबीज करायची आहे. तिथे त्यांनी पाळेमुळे घट्ट रोवली की ते महिलांवरील कायदे नक्की अंमलात आणतील, यात शंका नाही, असे राजकीय विश्लेषक आणि नागपूर विद्यापीठाच्या राजशास्त्र विभागाचे प्रमुख मोहन काशिकर सांगतात.

दरम्यान, आधीच्या सरकारचे महिलांविषयीचे जे कायदे होते ते अबाधित राहणार असल्याचा दावा तालिबान्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्यांना इतर देशांची आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांची मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे सध्या ते मवाळ भूमिका घेत आहेत. एकदा त्यांना समर्थन मिळाले, की ते परत महिलांविषयीचे कठोर कायदे लागू करतील, असेही काशीकर सांगतात.

तालिबानची आश्वासने -

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य इनामुल्ला समानगणी याने मंगळवारी संवाद साधला. यात त्यांनी काय म्हटलंय हे जाणून घेऊया?

  • अफगाणिस्तान जनतेचे, त्यांच्या मालमत्तेचे आणि सन्मानाचे रक्षण 'इस्लामिक अमिरात' करेल

  • महिलांच्‍या हक्कांचे रक्षण

  • महिलांना शिक्षण व कामास परवानगी. हिजाब अनिवार्य

  • देशात शांतता व सुरक्षित वातावरण निर्मिती

  • नागरिकांनी नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू करावेत. विशेषतः शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कामकाज सुरू व्हावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT