afganistan sakal
ग्लोबल

युद्ध न लढताच अफगाण सैन्याने शरणागती का पत्करली? समजून घ्या..

अफगाणिस्तान सोडण्याआधीच तालिबानने पुन्हा वर्चस्व मिळवले. ही अमेरिकेची सर्वात मोठी हार आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: अमेरिकेसह (America) संपूर्ण जगाचा अंदाज चुकवत तालिबानने (Taliban) अवघ्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवलं. काबूल जिंकायला तालिबानला ९० दिवस लागतील असं अमेरिकेनं नुकतचं म्हंटल होतं. पण तालिबानने अवघ्या नऊ दिवसाच्या आत काबूल (Kabul) मिळवलं. खरंतर अफगाणि सैन्य (Afgan army) आणि तालिबानमध्ये घनघोर लढाई होईल. तालिबानचा पराभव होईल किंवा त्यांना विजय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल, असं अनेकांना वाटलं होतं. पण असं काहीच घडलं नाही.

अफगाणिस्तानवर अमेरिकेतील दिग्दर्शकांनी अनेक चित्रपटही बनवले

तालिबानने अत्यंत सहजतेने एक-एक प्रांत पादाक्रांत करुन अखेर काबूल मिळवलं. त्यानंतर तिथे आता अराजकाची स्थिती निर्माण झालीय. काबूल विमानतळावरुन समोरी येणारी दृश्य, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या काळाजाचा ठोका चुकेल. अफगाणि नागरिक आपल्या कुटुंब कबिल्यासह देश सोडण्यासाठी हतबल झाले आहेत. अमेरिका मागच्या २० वर्षांपासून अफगाणिस्तानमध्ये आहे. अमेरिकेच्या अनेक सैन्य कमांडर्सनी अफगाणिस्तानने पाहिले. अफगाणिस्तानवर अमेरिकेतील दिग्दर्शकांनी अनेक चित्रपटही बनवले. दोन दशकांच्या या काळात अमेरिकेने अफगाणिस्तानचं सैन्यही घडवलं. पण मोक्याच्या क्षणी हे सैन्य ढेपाळलं.

सपशेल शरणागती पत्करली? हा मुख्य प्रश्न आहे.

कट्टरपंथीय तालिबानी प्रवृत्तीसमोर लढू शकलं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा अत्यंत सहजतेने तालिबानला संपूर्ण अफगाणिस्तान मिळालाय. अफगाणि सैन्याने जितक्या वेगाने शरणागती पत्करली. तितक्या वेगाने तालिबान काबूलपर्यंत पोहोचलं. पण अमेरिकेने घडवलेलं हे अफगाणि सैन्य तालिबान विरोधात का लढलं नाही? का सपशेल शरणागती पत्करली? हा मुख्य प्रश्न आहे. अमेरिकेने जे साहित्य अफगाणी सैन्याला तालिबान विरोधात लढण्यासाठी दिलं होतं. आज त्याच्याबरोबर तालिबानचे फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. काही शहरांमध्ये तालिबानला प्रतिकार झाला. पण विरोधाची धार तितकी नव्हती. त्यामुळे तालिबानला सहजतेने एकापाठोपाठ एक प्रांत ताब्यात घेता आले.

८३ अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च

दोन दशकात अमेरिकेने अफगाणिस्तानात शस्त्र, साहित्य आणि सैन्य प्रशिक्षणावर ८३ अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केला. पण शेवटी त्याचा काही उपयोग झाला नाही. कुठलही युद्ध लढताना सैन्य साहित्याबरोबर प्रखर देशभावना लागते. शत्रूशी दोन हात करण्याची जिद्द लागते. पण अफगाणि सैन्यामध्ये त्याचा अभाव दिसून आला. त्यामुळे तालिबानचा प्रवास अधिक सोपा झाला. तालिबान विरोधात लढण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य उभ करणं, ही ओबामा प्रशासनाची मुख्य रणनीती होती. दशकभरापूर्वीच अफगाणिस्तानच्या सैन्याकडे त्यांच्या देशाची सुरक्षा सोपवून तिथून निघण्याचा विचार ओबामा प्रशासनाने केला होता. त्या दृष्टीने अमेरिकेने प्रशिक्षणही दिले. पण अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याआधीच तालिबानने पुन्हा वर्चस्व मिळवले. ही अमेरिकेची सर्वात मोठी हार आहे. एक मजबूत, लढाऊ सैन्य उभारण्यात अमेरिका अपयशी ठरली आहे.

सैन्य चौक्यांना तालिबानी दहशतवादी घेरायचे

११ सप्टेंबर आधी अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य पूर्णपणे माघारी येईल, ही जो बायडेन यांनी घोषणा करण्याआधीच तालिबानने अफगाणिस्तानातील प्रांत काबीज करण्यास सुरुवात केली होती. अफगाणिस्तानातील सैन्य चौक्यांना तालिबानी दहशतवादी घेरायचे. अफगाणि सैन्याला वेळेवर अन्न आणि युद्ध साहित्य मिळत नव्हते. उपासमार आणि शस्त्रास्त्रांची कमतरता भेडसावत होती. तालिबानने या सैनिकांना, कुठलाही प्रतिकार केला नाही, तर सुरक्षित जाऊ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना त्यांची शस्त्र तिथेच सोडून जाण्यासही सांगण्यात आले होते.

हळू-हळू तालिबानला रस्ते, गाव, जिल्हे आणि एक-एक प्रांत ताब्यात घेता आला

उपासमार वरती लढण्यासाठी शस्त्र नाही, त्यामुळे या सैनिकांनी शरणागतीचा मार्ग पत्करला. त्यामुळे हळू-हळू तालिबानला रस्ते, गाव, जिल्हे आणि एक-एक प्रांत ताब्यात घेता आला. सर्वच ठिकाणी एकच तक्रार असायची. हवाई हल्ल्याची मदत नाही आणि अन्न, युद्धसाहित्याचा तुटवडा. कागदावर अफगाणिस्तानचे सैन्य ३ लाखाच्या घरात होते. पण अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते प्रत्यक्षात निम्मे सैन्य सुद्धा लढत नव्हते. याला भ्रष्ट्राचार सुद्धा एक कारण आहे. कारण कागदावर जितके सैनिक होते, तितके प्रत्यक्षात सैन्यात होते का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे अफगाणि सैन्य तालिबान पुढे टिकाव धरु शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT