SpaceX Starship Rocket Explodes : इलॉन मस्कच्या स्पेस रिसर्च कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशिप रॉकेटचा प्रक्षेपण होताच त्याचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्टारशिप रॉकेटच्या हवेत तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं. हे रॉकेट प्रक्षेपित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.
स्टारशिप रॉकेटचे प्रक्षेपण तीन दिवसांपूर्वीच ठरले होते. मात्र, काही कारणांमुळे हे प्रक्षेपण गुरुवारी झाले. गुरुवारी संध्याकाळी स्पेस एक्सने हे रॉकेट प्रक्षेपित करताच सुरुवातीला सर्वकाही ठीक वाटत होते, परंतु कक्षेत जाण्यापूर्वी रॉकेटमध्ये एक जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे रॉकेटचा हवेतच तुकडे झाले.
या घटनेचे व्हिडिओही समोर येत आहेत. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की प्रक्षेपणानंतर हे रॉकेट जमिनीपासून खूप उंचावर पोहोचले होते. मात्र अचानक त्याचा स्फोट झाला. स्पेस एक्स कंपनीसाठी हा मोठा धक्का आहे. कारण कंपनीला या रॉकेटकडून खूप आशा होत्या.
SpaceX ने रॉकेटबद्दल माहिती शेअर केली होती की या रॉकेटच्या मदतीने मानवांना इतर ग्रहांवर देखील पाठवले जाऊ शकते. कंपनीने सांगितले होते की इलॉन मस्क यांना 2029 पर्यंत अंतराळात मानव पाठवायचा आहे आणि तिथे मानवांसाठी राहण्याची व्यवस्था देखील करायची आहे. या ऑपरेशनसाठी स्टारशिप तयार करण्यात आली होती.
हे आतापर्यंतचे जगातील सर्वात मोठे रॉकेट होते. त्याची उंची 395 फूट म्हणजे 120 मीटर होती. अलीकडेच, नासाने 2025 पर्यंत अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याबाबत घोषणा केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.