World Economic Council india Heavy industry carbon-free soon announcement from america  sakal
ग्लोबल

अवजड उद्योग लवकरच होणार कार्बनमुक्त!

जागतिक आर्थिक परिषद : आघाडीमध्ये भारताचाही समावेश, अमेरिकेची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

दाओस : अवजड उद्योग आणि दीर्घपल्ल्याच्या वाहतूक क्षेत्राला कार्बनमुक्त करण्यासाठी पहिले पाऊल टाकणाऱ्या देशांच्या आघाडीमध्ये भारताचाही समावेश झाल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. केवळ या दोन क्षेत्रांचा कार्बन उत्सर्जनामध्ये ३० टक्के एवढा वाटा आहे. अमेरिकी अध्यक्षांचे वातावरण बदलाशी संबंधित विशेष प्रतिनिधी जॉन केरी यांनी आज ही घोषणा केली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि ‘जागतिक आर्थिक परिषद’च्या पुढाकाराने उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या माध्यमातून ज्या उद्योगांतून सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होती ती कार्बनमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या तत्त्वाचा अवलंब करण्यात आला आहे.

या आघाडीमध्ये आणखी ५० नवे कॉर्पोरेट सदस्य सहभागी झाले असून त्यामुळे याआघाडीचे एकूण भांडवली मूल्य हे ८.५ ट्रिलियन डॉलवर गेले आहे. भारताशिवाय डेन्मार्क, इटली, जपान, नॉर्वे, सिंगापूर, स्वीडन, आणि ब्रिटन हे देशही यामध्ये सहभागी झाले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून स्वच्छ तंत्रज्ञानासाठी बाजारपेठेच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आणि खासगी क्षेत्रांची देखील मदत घेण्यात येणार आहे.

या आघाडीच्या संचालक मंडळामध्ये भारतासोबतच जपान आणि स्वीडन यांचाही सहभाग आहे. ब्रेकथ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासह आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केरी यांनी ही घोषणा केली. सध्या येथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे वार्षिक अधिवेशन सुरू असून त्या अधिवेशनामध्येच ही घोषणा करण्यात आली.

आम्हाला स्वस्त दरातील पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विकासावर भर द्यावा लागेल. ही आघाडी त्या दृष्टीने टाकण्यात येणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून भारताने जागतिक नेतृत्वासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

- पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT