World Pizza Day 2023 esakal
ग्लोबल

World Pizza Day 2024 : पिझ्झा लव्हर्ससाठी 5 देसी स्टाइल पिझ्झा रेसिपीज

आज जागतिक पिझ्झा डे दिवशी काही खास पिझ्झा रेसिपीज सांगत आहोत. जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Some Desi Style Pizza Recipes : पिझ्झा भारतीय पदार्थ नसला तरी हा इटालियन पदार्थ भारतीयांनी मनापासून स्वीकारला. लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच पिझ्झा फार आवडतो. त्यामुळे हल्ली बहुतेक घरांमध्ये कोणतीही पार्टी असो किंवा मुलांचा हट्ट महिन्यातून साधारण २-३ वेळा तरी पिझ्झा येतोच. शिवाय काही लोक घरच्या घरी पिझ्झा बनवणंही पसंत करतात. त्यामुळे आता त्याला इंडियन टच आला आहे.

बटर चिकन पिझा

या डिशमधून आपण इटालीयन आणि इंडियन अशा दोन्ही चवींच काँबिनेशन केलं आहे. क्रिमी बटर चिकन, पिझ्झा बेसवर पसरवून ओव्हनमध्ये नीट बेक करून घ्या. जर ओव्हन नसेल तर तव्यावरही बटर टाकून देसी स्टाइलने बेक करता येऊ शकते. बेक करण्याआधी त्यावर कांद्याचे लहान चौकोनी तुकडे, शिमला मिरचीचे तुकडे, ग्रेटेड चीजचा एक थर लावून घ्या आणि छान बेक करा. जर तुमच्याकडे पिझ्झा बेस नसेल तर हे तुम्ही ब्रेडवर पण करू शकता.

चिकन तंदूरी पिझ्झा

या पिझ्झासाठी मसालेदार, स्मोकी आणि काहीसे जळके तंदूरी चिकनचे पिसेस यावर टॉपिंग्ज म्हणून टाकावे. त्याआधी पिझ्झाबेसवर पिझा सॉस लावावा. त्यावर हे चिकन पिसेस टाका. त्यावर पॅरमेसान चीज त्यावर घाला. चीज वितळेपर्यंत बेक करा.

मटन खिमा पिझ्झा

नॉनव्हेज प्रेमींसाठी मटन म्हणजे आनंद अशी व्याख्या असते. त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. पिझाबेसवर मसालेदार मटन खिमा टॉपिंग्ज म्हणून वापरू शकतात तर बेसवर करी पसरवून छान बेक करून घ्या. यासाठी आदल्या दिवशीची उरलेली करी यासाठी वापरली तर स्वाद अजून वाढतो.

पनीर मखनी पिझा

पिझामध्ये ही रिच, क्रिमी फ्लेवरची रेसिपी व्हेजिटेरीयन लोकांसाठी नवं आकर्षण आहे. पिझा बेसवर एक्स्ट्रा बटर मनीर मखनीचा लेयर लावा. त्यावर कांदा, शिमला मिरचीचे टॉपिंग्ज लावा. नीट बेक करून घ्या.

ब्रेड पिझा

जर दिवसभरात कधीही पिझा खाण्याची इच्छा झाली तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा इंस्टंट पिझा आहे. जो ब्रेडच्या दोन स्लाइसने तुम्हाला बनवता येईल. या स्लाइसवर पिझा सॉस पसरवा. त्यावर तुमच्याकडे उपलब्ध गोष्टींचे टॉपिंग्ज पसरवा. चीज घाला आणि तव्यावर नीट शेकून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT