Iran Attacks Israel Esakal
ग्लोबल

Iran Attacks Israel: इराणच्या हल्ल्यानंतर वर्ल्ड पॉवर इस्रायल मागे, वाचा जागतिक नेत्यांच्या प्रतिक्रिया

Israel War: सीरियातील इराणच्या दूतावासावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर इराण अस्वस्थ आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी इस्रायलला जबाबदार धरले होत.

आशुतोष मसगौंडे

Iran Attacks Israel:

इराणने इस्रायलवर हल्ला केल्याने मध्यपूर्वेत मोठी खळबळ उडाली आहे. इराणचा सरकारी टीव्हीने त्यांच्या रिव्होल्युशनरी गार्डने इस्रायलच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याची पुष्टी केली आहे.

शनिवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलवर डझनभर ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराण आणि इस्रायलमधील शत्रुत्व अनेक दशके जुने आहे, परंतु इराणने इस्रायलवर थेट हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे, इराणने इस्रायलवर 100 हून अधिक ड्रोन हल्ले केले आहेत, जे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले आहेत.

या सर्व घडामोडी घडत असताना जगभराती अनेक देश आणि त्यांचे नेते इस्रायलच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत.

सीरियातील इराणच्या दूतावासावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर इराण अस्वस्थ आहे. या हल्ल्यासाठी त्यांनी इस्रायलला जबाबदार धरले होत. यासोबतच इराणनेही इस्रायलवर अनेक ड्रोन डागून या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

यानंतर आता अमेरिका इस्रायलच्या बचावासाठी उतरली आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायल-इराण युद्धाचा धोका लक्षात घेता, यूकेने या भागात अनेक रॉयल एअर फोर्स जेट आणि टँकर पाठवले आहेत.

या हल्ल्याबाबत आपले मत व्यक्त करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले, इराणच्या इस्रायल विरुद्धच्या हल्ल्यांच्या माहितीसाठी मी नुकतेच माझ्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाला भेटलो. इराण आणि त्याच्या खोट्या धमक्यांपासून इस्रायलच्या सुरक्षेसाठी आम्ही कायम वचनबद्ध आहोत.

या हल्लाच्या निषेध करताना इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या हल्ल्यांमुळे तणाव वाढण्याचा आणि प्रदेश अस्थिर होण्याचा धोका आहे. इराणने आपल्याच परिसरात अराजकता पेरण्याचा मानस असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे."

"यूके इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी आणि जॉर्डन आणि इराकसह आमच्या सर्व प्रादेशिक मित्रांच्या सुरक्षेसाठी उभे राहील. आमच्या मित्रपक्षांसोबत, आम्ही परिस्थिती स्थिर करण्यासाठी तातडीने काम करत आहोत. आणखी रक्तपात कोणीही पाहू इच्छित नाही," असे सुनक पुढे म्हणाले.

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वाबद्दल आम्ही चिंतित आहोत ज्यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. आम्ही तात्काळ डी-एस्केलेशन, संयम बाळगणे, हिंसाचारातून माघार घेणे आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन करतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

या सर्व परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रदेशातील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या जवळच्या संपर्कात आहेत. प्रदेशात सुरक्षा आणि स्थिरता राखली जाणे अत्यावश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT