ग्लोबल

World Television Day 2023: दिवसभराचा थकवा दूर करणाऱ्या टेलिव्हिजनची सुरुवात कधीपासून झाली? जाणून घ्या

Aishwarya Musale

समाजात दिवसागणिक टेलिव्हिजन पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आज आपण टिव्हीवर जे कार्यक्रम पाहतो ते एकेकाळी ब्लॅक अॅन्ड व्हाइट असायचे. त्यानंतर तंत्रज्ञान युगात झालेल्या बदलांमुळे टिव्हीमध्येही अनेक बदल झालेले पाहायला मिळतात.

तंत्रज्ञान युगात झालेल्या बदलांमुळे टिव्हीमध्येही अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. आधी एखाद्या डब्ब्याप्रमाणे दिसणारा हा टिव्ही आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे. 

आता बाजारात 4k, HD, LCD, LED असे नानाप्रकारचे टिव्ही आल्याने आत्ताच्या पोरांना त्यांच विशेष कौतुक वाटत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने तर ही उत्सुकता शुन्यच झालीये. पण 1970-80 दरम्यान पुर्ण गल्लीत एक टिव्हिचा काळा डब्बा असला तरी भारी काहीतरी वाटायचं.

खाटेवर बसलेले बाबा जे सांगतील तेच चॅनल सर्वांना बघाव लागणार. कधी रामायण कधी महाभारत तर कधी अमिताभ यांचा एखादा जुना मुव्ही... आज आंतरराष्ट्रीय टेलीव्हीजन दिना निमीत्त भारतात टिव्ही कसा आणि कधी आला ते बघू.

संयुक्त राष्ट्र दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिन साजरा करते. संप्रेषण आणि जागतिकीकरणामध्ये टेलिव्हिजनच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

युनायटेड नेशन्सने 17 डिसेंबर 1996 रोजी एक समिती तयार केली. त्यांनी समाजाच्या मनात दूरगामी परिणाम करणारे तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंशी संबंधित माहितीच्या जागतिक देवाणघेवाण करणारे माध्यम म्हणून टेलिव्हिजनचे महत्त्व ओळखले. त्यासाठीच समितीने २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshwardhan Patil: सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे हर्षवर्धन पाटलांचा अदृश्य हात... तुतारी हातात घेताच केला मोठा खुलासा

Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्येत बिघडली? सोशल मिडियावर पोस्ट करून केला अफवेचा खुलासा

Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : दसऱ्यानंतर राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; येथे घेणार सभा

Raj Thackeray Nashik Daura : महाआघाडी-महायुतीवर जनता नाराज, तुम्‍हाला विजयाची संधी, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT