World's Smallest Baby : गेल्या वर्षी क्वेक यू झुआन जन्मली तेव्हा तिचे वजन अवघ्या एका सफरचंदा एवढे होते. जन्मावेळी सर्वात लहान असलेले बाळ तब्बल 13 महिन्यांनतर हॉस्पिटलमधून घरी परतणार आहे. क्वेक यू झुआन हीचे वजन अवघे 212 ग्रॅम म्हणजे फक्त एका सफरचंदाच्या वजनाएवढे होते. सिंगापूरमधील नॅशनल युनिवर्सिटी हॉस्पिटल (NHU) मध्ये गेल्या वर्षी 9 जून रोजी तिचा जन्म झाला.
एनएचयू(NHU) दिलेल्या अहवालानुसार, क्वेक यू झुआन ही 4 महिने प्रीमॅच्युअर असून अवघ्या 25 आठवड्यांमध्ये तिचा जन्म झाला. तिच्या जन्मावेळी ती फक्त 24 सेमी एवढी होती. क्वेक यू झुआन खरं तर इतकी लहान होती की, जेव्हा तिला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात नेण्यात आले, तेव्हा ड्युटीवरील असलेल्या नर्सला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. एनएचयू(NHU) मध्ये नर्स असलेली झांग सुहे, द स्ट्रेट टाइम्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली की, मी जेव्हा क्वेक यू झुआन पाहिला तेव्हा मला धक्काच बसला त्यामुळे मी आमच्या विभागातील प्राध्यापकांना विचारले की, त्यांना विश्वास बसतोय का? मी गेले 22 वर्ष नर्स म्हणून काम करतेय, मी आजपर्यंत एवढे लहान बाळ पाहिले नव्हते.
क्वेक यू झुआन हिच्यावर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभाग 13 महिने उपचार करण्यात आले. काही आठवडे व्हेंटीलेटवर ठेवल्यानंतर आता तिचे वडन 6.3 किलोग्रॅम झाले आहे. गेल्या महिन्यात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले. प्रिमॅच्यूअर बर्थ असलेले जगातील सर्वान लहान बाळ असल्याचे मानले जात आहे.
''क्वेक यू झुआन हिच्या जन्मावेळी डिलिव्हरी करणारे डॉक्टरांना या आठवडयात रिपोर्ट्सला पहिल्यांदा माहिती दिली. एनयूएचमधील नियोनेटोलॉजी विभागात वरिष्ठ सल्लागार असलेले डॉ एनजी यांनी सांगितले की, ''जन्मावेळी क्वेक यू झुआनचे वजन अपेक्षापेक्षा खूपच कमी होते. आम्ही 400,500, किंवा 600 ग्रॅम वजन असेल असा अंदाज होता पण वास्तविकता ते फक्त 212 ग्रॅम इतकेच होते.''
''प्रीमॅच्युअर बाळावर उपचार करणे हे एक मोठे आव्हान होते. तिची त्वचा इतकी नाजूक होती की डॉक्टरांनी तिची तपासणी करणे शक्य नव्हते, तिचे शरीर इतके लहान होते की डॉक्टरांना सर्वात लहान श्वासोच्छवासाची नळी शोधावी लागली आणि तिच्या केअरटेकरला तिला डायपर फिट बसावे म्हणून कापावे लागले. ती इतकी लहान होती की तिला देण्यात येणाऱ्या औषधाचे प्रमाण देखील डेसीमल पॉईंटपर्यंत कमी करावे लागले'' अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.
''जन्मावेळी निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत क्वेक यू झुआन हीच्या चिकाटी आणि सुधारणेमुळे तिने आसपासच्या लोकांना प्रेरणा दिली आहे ज्यामुळे ती एक्सट्राऑरिडनरी कोविड 19 बेबी ठरली जीने सध्याच्या वातावरणात आशेचा किरण ठरत आहे.'' अशी माहिती हॉस्पिलट प्रशासनाने दिली. यू झुआनच्या पालकांना वैद्यकीय उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे जेणेकरून तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही घरी तिची काळजी घेता येऊ शकेल.
आयोवा विद्यापीठाच्या सर्वात लहान बाळांच्या रजिस्ट्रीनुसार, जन्मापूर्वी सर्वात लहान बाळाचा या पूर्वीचा रेकॉर्ड 2018 मध्ये जन्मलेल्या मुलीच्या नावावर होता, जिचे वजन 245 ग्रॅम होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.