xi jinping and modi  
ग्लोबल

G20 Delhi: चीनचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीतल्या G20 परिषदेला येणार नाहीत; चीनकडून 'या' नेत्याचं नाव पुढे

जिनपिंग येणार नसल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी खंत व्यक्त केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

G20 Delhi : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दिल्लीत होत असलेल्या G20 परिषदेला येणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांच्या ऐवजी चीनचे प्रिमियर ली क्वांग हे या परिषदेला हजेरी लावतील, असं स्पष्टीकरण चीनकडून देण्यात आलं आहे. ९ आणि १० सप्टेंबर या दोन दिवसांच्या काळात दिल्लीत ही परिषद पार पडणार आहे. (Xi Jinping to miss G20 in New Delhi China says Premier Li Qiang will attend)

दिल्लीतील G20 परिषदेत भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील G20 परिषदेत चर्चा होणं अपेक्षित आहे, यापार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतात येणं टाळल्यानं हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

चीनचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी थोडक्या आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत सरकानं दिलेल्या निमंत्रणाला अनुसरुन स्टेट काऊन्सिलचे प्रिमिअर ली क्वांग हे नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या G20 परिषदेला हजेरी लावतील. (Latest Marathi News)

अद्याप लेखी निवेदन नाही

चीनच्या अधिकाऱ्यांनी हे अधिकृत निवेदन भारतातील आपल्या राजदुतांना २ सप्टेंबर रोजी कळवलं आहे. यामध्ये म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे नवी दिल्लीतील बैठकीला हजेरी लावणार नाहीत. पण अद्याप या निर्णयाचं लेखी निर्णय अद्याप सुपूर्द झालेला नाही. भारतानं अशा प्रकारचं एक हायप्रोफाईल परिषदेचं आयोजन केलेलं असतानाजिनपिंग हे भारतात का येणार नाहीत? याबाबत मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं कोणतही कारण दिलेलं नाही. (Marathi Tajya Batmya)

जिनपिंग येत नसल्यानं बायडन यांना खंत

शी जिनपिंग यांच्या गैरहजेरीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी म्हटलं की, चीनचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला हजर राहत नसल्याची खंत आहे. पण बायडन हे या परिषदेसाठी भारतात येणार असून ७ ते १० सप्टेंबर या काळात ते भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत.

भारत-चीनदरम्यान तणाव

चीनची राजधानी बिजिंगमधून नुकताच त्यांच्या देशाचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये भारताचा अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील अक्साई चीन हा चीनचा भाग असल्याचं दाखवण्यात आला होता. चीनच्या या भूमिकेचा भारताचा कडक शब्दांत निषेध नोंदवला होता.

पुतीनही दांडी मारणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी देखील यापूर्वीच आपण भारतातील G20 परिषदेला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. युक्रेनमधील विशेष मिलिटरी ऑपरेशनवर आपलं सध्या बारकाईन लक्ष असल्याचं कारण त्यांना यासाठी दिलं होतं. त्यामुळं रशियाकडून त्यांचे परराष्ट्र मंत्री सर्गे रावरोव हे दिल्लीतील G20 परिषदेला हजेरी लावणार आहेत.

G20 परिषदेला कोणते देश हजेरी लावणार?

दिल्लीतील G20 परिषदेला अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, तुर्की, युके, अमेरिका आणि युरोपिअन युनियन असे २० देश सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

Winter Tourism : नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या उत्तराखंडमधील सात हिल स्टेशन्स तुमची वाट पाहत आहेत

SCROLL FOR NEXT