Pakistan Cabinet eSakal
ग्लोबल

Pakistan Cabinet : दहशतवादी यासिन मलिकची पत्नी झाली पाकिस्तानच्या पंतप्रधानांची विशेष सल्लागार; नव्या कॅबिनेटने घेतली शपथ

Yasin Malik Wife : 'काश्मीर हा पूर्णपणे पाकिस्तानचा आहे, आणि आम्ही तो घेऊनच राहू' असं ती म्हणाली होती.

Sudesh

दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवार-उल-हक कक्कड यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. यामध्ये कुख्यात दहशतवादी यासिन मलिकच्या पत्नीचाही सहभाग होता.

पाकिस्तानातील टीव्ही चॅनल जियो न्यूजने याबाबतची माहिती दिली. यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन ही पंतप्रधानांची विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहे. तिच्यासोबत आणखी चार जणांना विशेष सल्लागार म्हणून नेमलं आहे.

कसं आहे मंत्रिमंडळ?

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत जलील अब्बास जिलानी यांना परराष्ट्र मंत्रीपद मिळालं आहे. तर माजी केंद्रीय बँक प्रमुख शमशाद अख्तर यांना अर्थमंत्री करण्यात आलं आहे. गुरुवारी एकूण 16 मंत्री आणि तीन सल्लागारांचा शपथविधी पार पडला. मंत्रिमंडळात वरिष्ठ पत्रकार मुर्तजा सोलंगी यांनाही संधी देण्यात आली आहे.

भारताची कट्टर विरोधक मुशाल

मुशाल हुसैन ही भारताविरोधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या काश्मीर फाईल्स चित्रपटानंतरही तिने असंच विधान केलं होतं. 'काश्मीर हा पूर्णपणे पाकिस्तानचा आहे, आणि आम्ही तो घेऊनच राहू' असं ती म्हणाली होती. सोबतच, यासिन मलिकला तुरुंगातून सोडवण्यासाठी मुशाल पाकिस्तानात मोहीमही चालवत आहे.

कोण आहे यासिन मलिक?

यासिन मलिक हा काश्मिरी दहशतवादी आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा तो नेता आहे. टेरर फंडिंग, दहशतवाद पसरवणे, तरुणांना भडकावणे आणि एअरफोर्सच्या जवानांवर हल्ला करणे असे कित्येक आरोप यासिनवर आहेत.

यासोबतच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीच्या अपहरणाचा आरोपही यासिनवर आहे. त्याला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेप आणि आणखी काही प्रकरणांमध्ये 10 वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या तो भारतात तुरुंगात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT