Yemen Village  esakal
ग्लोबल

Yemen Village : जगातलं एकमेव गाव, जिथे कधीच पाऊस पडत नाही! यामागे आहे खास कारण

ज्या गावात कधीच पाऊस पडला नाही तिथले लोक कसे राहात असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. जाणून घेऊया या गावाबाबत सविस्तर.

साक्षी राऊत

Yemen Village : जून महिना सुरु झाला असून आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल. अनेक ठिकाणी दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो तर काही ठिकाणी फार कमी प्रमाणात पाऊस पडतो. भारतातील मेघालय भागात सर्वाधिक पावसाच्या नोंदीचा रेकॉर्ड आहे. मात्र तुम्हाला माहितीये काय? जगात असंही एक ठिकाण आहे जिथे आजपर्यंत कधीच पाऊस पडला नाही. ज्या गावात कधीच पाऊस पडला नाही तिथले लोक कसे राहात असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. जाणून घेऊया या गावाबाबत सविस्तर.

मीडिया रिपोर्टनुसार यमनची राजधानी सनामध्ये स्थित आहे. या गावाचे नाव 'अल-हुतैग गाव' असं आहे. या भागात उष्णता फार आहे. मात्र हिवाळ्यात या भाग अत्यंत थंड असतो. या भागातली थंडी एवढी भयंकर असते की बँकेटशिवाय रात्री लोक झोपूच शकत नाही. तर उन्हाळ्यात हीच स्थिती विरुद्ध असते. उन्हाळ्यात लोकांना इथे प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतो.

तरी मात्र या भागात कधीच पाऊस पडत नाही. यामागे एक खास कारण आहे. हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3,200 मीटर उंचीवर वसलेले आहे. 2000 मीटर उंचीवर ढग तयार झाल्याचे स्थानिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे या गावाच्या खूप खाली ढग तयार होतात. आणि कदाचित याच कारणामुळे इथे पाऊस पडत नाही. या कारणाने इथे कधीच पाऊस पडणार नाही, मात्र या गावातील लोक स्वर्गात राहतात अशी गावातील लोकांची श्रद्धा आहे.

अजून एका मीडिया रिपोर्टनुसार यमनचे अल-हुतैब गाव हे फार प्रसिद्ध आहे. पर्यटक येथे नेहमी येतात.हे गाव डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे. येथून खालील दृश्य डोळ्यांना सुखदायी दिसते. गावात फारशी घरे नाहीत पण जेवढी आहेत ती घरे खूप सुंदर आहेत. अल-हुतैब व्हिलेज गावात तुम्हाला ग्रामीण आणि शहरी वैशिष्ट्यांसह प्राचीन आणि आधुनिक वास्तुकले एकत्रिकरण दिसून येईल. या गावातील बहुतांश लोक 'अल-बोहरा किंवा अल-मुक्रमा' समाजाचे आहेत. त्यांना येमेनी समुदाय म्हणतात. (village)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT