Space Esakal
ग्लोबल

Space: अंतराळातून चीनची ग्रेट वॉल दिसते की नाही दिसतं ?

अमेरिका, चीन आणि दुबई इथली काही ठिकाणे अंतराळातून स्पष्ट दिसतात.

सकाळ डिजिटल टीम

पृथ्वी आणि अवकाशाच्या सीमेला कार्मन लाइन म्हणतात, जी लाइन म्हणजे रेख ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर आहे.

याच्यांवर हा भौतिकशास्त्रज्ञ थिओडोर वॉन कर्मन यांनी संशोधन केले होते. ही रेख पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर आहे. एवढ्या उंचीवरून पृथ्वीचे दृश्य पाहणे म्हणजे जणू स्वप्नच आहे. खरं तर, शेकडो किलोमीटर दूर असूनही, पृथ्वीवरील अनेक ठिकाणे अंतराळातून स्पष्टपणे दिसतात.

अमेरिका, चीन आणि दुबई इथले काही ठिकाणे अंतराळातून स्पष्ट दिसतात. अंतराळातून घेतलेल्या पृथ्वीच्या चित्रांमुळे आपल्या अनेकदा भुरळ पडते आणि मनात आपोआप विचारचक्र घुुमू लागते की, पृथ्वीवरच्या अजून काय काय गोष्टी अंतराळातून दिसतात?

चला तर मग आज जाणून घेऊया पृथ्वीवरील कोणत्या गोष्टी कोणती ठिकाणे आहेत जी अंतराळातून दिसतात.

1) बिंघम कॉपर माईन (Bingham Canyon Mine)

अमेरिकेच्या 'सॉल्ट लेक सिटी'च्या जवळ असलेली बिंगहॅम कॅनियन खाण अंतराळातून दिसते. ही खाण जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित उत्खनन झालेली खाण म्हणूनही ओळखली जाते. ही खाण Karman line वरूनही स्पष्टपणे दिसते. समुद्रसपाटीपासून 305 ते 531 किमी अंतरावर परिक्रमा करत असलेल्या स्पेस शटल' या व्यक्तीने हे पाहिलं होत.

2) थ्री गोरजेस डैम (Three Gorges Dam)

नासाच्या म्हणण्यानुसार, चीनचा थ्री गॉर्जेस डॅम अवकाशातूनही स्पष्टपणे दिसत आहे. चीनमधील यांग्त्झी नदीपर्यंत पसरलेले वीजनिर्मिती करणारे हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. हे धरण 607 फूट उंच आणि 2 किमी लांब आहे. ते तयार करण्यासाठी 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.

3) पाम जुमेराह आईलैंड (Palm Jumeirah Island)

नासाच्या म्हणण्यानुसार, जगभरात अभियांत्रिकीचे उदाहरण म्हणून प्रसिद्ध असलेले दुबईचे पाम जुमेराह बेट हे कार्मन लाइन वरूनही पाहता येऊ शकतं. समुद्रसपाटीपासून सरासरी 400 किमी उंचीवर फिरणाऱ्या 800 मिमी लेन्सचा वापर करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) झाडाच्या आकाराचे दिसणारे पाम जुमेराह बेट देखील स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.

4) हायवे (Highways)

याशिवाय पृथ्वीवरील अनेक महामार्ग योग्य प्रकाशात अवकाशातूनही दिसतात. विशेषतः असे हाईवे जे वाळवंटासारख्या ओसाड प्रदेशातून जातात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) चे माजी कमांडर क्रिस हैडफ़ील्ड (Chris Hadfield) यांनी सांगितलं की, हे हाईवे दिसणार की नाही दिसणार, हे इथल्या भौगोलिक परिस्थितीवर आणि रोषणाईवर अवलंबून असते.

5) वॉल ऑफ चायना Great Wall of China

चीनच्या ग्रेट वॉलबद्दल नेहमीच सांगितलं जातं की ही भिंत अंतराळातूनही दिसते. पण तुम्हाला खरी गोष्ट माहिती का? 'वॉल ऑफ चायना' ही चिनची भिंत अंतराळातून दिसत नाही. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) चे माजी कमांडर क्रिस हॅडफिल्ड यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. क्रिसच्या मते, चीनची भिंत अंतराळातून दिसू शकत नाही, कारण ही भिंत अतिशय बारीक आहे.

6) गीजा पिरॅमिड्सही (Pyramids of Giza)

गीजाचे पिरॅमिड्स हे अंतराळातून दिसतात की नाही याबद्दल अंतराळवीरांमध्ये काही मतभेद आहेत. ब्रिटीश अंतराळवीर टिम पीक यांनी सांगितले की गीजाचे पिरॅमिड्स अंतराळातून दिसत नाहीत, परंतु त्यांचा असा अंदाज आहे की ते 800 मिमी लेन्सद्वारे ते तिथून पाहिले जाऊ शकतात. तर याच्या उलट नासाचे माजी अंतराळवीर आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कमांडर लेरॉय चिआओ यांनी दावा केला की त्यांनी कक्षेतून पिरॅमिड पाहिले होते.

7) इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) कमांडर लेरॉय चियाओ म्हणतात की, जगातील अनेक शहरे अंतराळातूनही दिसतात. या दाव्याला नासाचे माजी अंतराळवीर क्लेटन अँडरसन यांनीही सांगितल आहे की, हे शहरे खिडकीतून राखाडी ठिपके म्हणून पाहू शकतो. पुढे ते सांगतात की अंतराळातून पुन्हा पुन्हा पहाव वाटणारी माझी आवडती गोष्ट म्हणजे सहारा वाळवंट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT