Amit Shah on China : मागील कित्येक वर्षांपासून चीनच्या भारताविरोधी कुरापती सुरु आहेत. नुकतंच चीनने भारताच्या ताब्यातील अरुणाचल प्रदेशच्या हद्दीतील काही ठिकाणांची नावं बदलली. त्यामुळे देशात चीनविरोधात संतापाची उसळली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
अमित शाह यांनी किबिथू येथे 'व्हाईब्रेंट व्हिलेज प्रोग्राम' आणि विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी चीनचा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, चीनने आजच अमित शाह यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होती. त्यावर बोलतांना शाह यांनी आमच्या जमिनीकडे कुणीही डोळे वर करुन बघू शकत नाही, असा इशाराच दिला.
अमित शाह पुढे म्हणाले की, सैनिकांच्या पराक्रमामुळे आमची भूमी सुरक्षित आहे. आमच्या देशात अतिक्रमण तर सोडाच पण सुईच्या टोकाऐवढी जमीनही कुणी घेऊ शकणार नाही. संपूर्ण देश आज आपापल्या घरात सुखानं झोप घेत आहे. कारण आमचे आयटीबीपीचे जवान आणि सेना आमच्या सीमारेषांवर दिवसरात्र तैनात आहेत. त्यामुळे वाईट नजर टाकण्याची कुणाचीच हिंमत नाहीये.
ते पुढे म्हणाले की, २०१४च्या पूर्वी पूर्ण ईशान्य प्रदेश अशांत होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ९ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये लूक ईस्ट धोरणामुळे या भागाला ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान चीनने अमित शाह यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. एक निवेदन काढून चीनने त्यांचा दौरा हा प्रादेशिक सार्वभौमत्त्वाचे उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावं बदलली आहेत. परंतु अशी मनगढंत नावं ठेवल्याने वास्तुस्थिती बदलणार नसल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. चीनने मागील सहा वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अशी कुरापत केली आहे. अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांच्या चिनी नावांनी घोषणा केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशमधल्या तिबेटच्या दक्षिणी प्रदेशाला 'जांगनान' म्हणत आपल्या देशाचा भाग असल्याचं सांगत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.