Goa Assembly Election News Sakal
Goa Assembly Election

तरूणांना रोजगार ते ज्येष्ठांना पेन्शन; गोवेकरांसाठी भाजपाचे 22 संकल्प

गोव्यात 40 जागांसाठी येत्या 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.

निनाद कुलकर्णी

पणजी : गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी येत्या 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्वांमध्ये भाजपने मंगळवारी गोवेकरांसाठी जाहीरनामा जाहीर केला असून यामध्ये एकूण 22 संकल्प करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्यापासून ते तरुणांना बेरोजार भत्त्याऐवजी रोजगार देण्यावर या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये पाच हजार रुपये टाकणार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. (Bjp Manifesto For Goa Election 2022)

भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकं काय ?

  • ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

  • तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये पाच हजार रुपये टाकणार

  • असल्याचं या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.

  • महिलांना घर खरेदीसाठी दोन टक्के व्याजाचं कर्ज देण्यता येणार आहे.

  • गोव्याला टुरिझम हब करणार आहोत.

  • क्लिन ट्रान्स्पोर्टेशनचाही संकल्प करण्यात येणार आहे.

  • गोव्यातील प्रत्येक घराला तीन मोफत एल.पी.जी. सिलिंडर

  • पात्र कुटुंबांना महिलांसाठी 2% आणि पुरुषांसाठी 4% व्याजदराने गृहकर्ज

  • पुढील पाच वर्षात सर्व गोमंतकीयांसाठी चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देणार.

  • पुढील तीन वर्षांसाठी पेट्रोल आणि डिझेलवरील राज्यशुल्क वाढवणार नाही.

  • मनोहर पर्रीकर कल्याण निधीची स्थापना करणार

  • गोव्यातील स्थानिक रहिवाश्यांना होमस्टे सुविधा सुरू करणार.

  • साहसी खेळ आणि समुद्र किनाऱ्याभोवती सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणार

  • येत्या पाच वर्षात राज्यातील वार्षिक पर्यटकांच्या आगमनाची संख्या दुप्पट करणार

  • पर्यटन क्षेत्राला चालना देत संमेलने आणि प्रदर्शनांचे (MICE) आशियातील केंद्र बनवणार.

  • पुढील पाच वर्षात राज्यातील बहुस्तरीय गरीबीचे पूर्णपणे निर्मूलन करणार

  • पुढील वीस वर्षांत गोव्यातून भारतासाठी सुवर्णपदक विजेता घडविण्यासाठी आम्ही 'मिशन गोल्ड कोस्ट' (मिशन सुवर्ण किनारा) ची सुरुवात करणार.

  • राज्यात नवीन आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम आणि फुटबॉल अकादमी स्थापन करणार, आगामी वर्षामध्ये फिफा- यु- 20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार

  • गोव्याला पुढील 10 वर्षात 50 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने विकासाच्या मार्गावर पुढे नेणार

  • आम्ही गोव्याचे आरोग्य आणि निरोगीपणाचे केंद्र म्हणून रूपांतर करू आणि महामारी नंतरच्या जगात एकत्रित कार्यासाठी आणि दूरस्थ कार्यचालनासाठी गोव्याला एक प्रमुख गतव्यस्थान बनवू.

  • गोव्याला उच्च तंत्रज्ञान संशोधनासाठीचे केंद्र म्हणून विकसित करणार

  • निर्यातभिमुख शेतकरी उत्पादन संघटनांना (एफ. पी. ओ.) राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढविण्याच्या व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 10 लाख मदत करणार.

  • राज्यातील मासेमारी उपक्रमाला पाठिंबा देणार, गोव्याला सीफूडचा देशातील आघाडीचा निर्यातदार बनवण्याचे ध्येय

  • पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांना खास सुविधा देणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT