पणजी: भाजपने गोव्याच्या निवडणुकीत (Goa Election Result 2022) जोरदार मुसंडी मारली आहे. सत्तेत असलेला भाजप (BJP) सध्या 19 जागांवर आघाडीवर असून भाजपने सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग दिला आहे. गोव्यात बहुमताचा आकडा हा 21 असून भाजप या आकड्याच्या जवळपास पोहचला आहे. दरम्यान, भाजपचे गोव्यातील आमदार (BJP MLA) राज्यापाल (Governor) पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटणार आहेत. बहुमताचा आकडा पार करण्यासाठी एक एक अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देत आहेत.
बिचोलीमचे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपला तीनही अपक्ष विजयी उमेदवार पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गोव्यात भाजपच्या नेत्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप नेते राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटण्यासाठी जात आहेत. ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
गोव्यात काही हाय व्होल्टेज लढती देखील पहायला मिळाल्या. यात भाजपमधून बंडखोरी केलेले उत्पल पर्रिकर यांचा भाजपच्या बाबुश मोन्सेरात पराभव झाला. तर सुरूवातीला पिछाडीवर पडलेल्या विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नंतरच्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये मुसंडी मारत ही पिछाडी भरून काढली. मात्र त्यांचा अवघ्या 500 मतांनी विजय झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.