prashant kishore  Sakal
Goa Assembly Election

Goa Election : प्रशांत किशोर अन् TMC मध्ये काडीमोड?

निवडणुकांच्या निकालापूर्वीच TMC ने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत.

निनाद कुलकर्णी

पणजी : गोव्यात 14 फेब्रवारी रोजी विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान पार पडले आहे. तर येत्या 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसने (TMC) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. गोव्याचे तृणमूल काँग्रेसचे प्रमुख किरण कांदोळकर यांनी प्रशांत किशोर यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले आहे. (TMC Goa Chief Kiran Kandolkar Upset with Prashant Kishor)

प्रशांत किशोर गोव्यात टीएमसीचे (Goa Assembly Election 2022) राजकीय सल्लागार म्हणून काम करत होते. परंतु, आता पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांची कंपनी I-PAC नीट काम करत नसल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर आणि टीएमसीमध्ये काडीमोड झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या गोवा युनिट प्रमुखपदाचा राजीनामा देत नसल्याचे कांदोळकर यांनी स्पष्ट केले असून, प्रशांत किशोर यांच्या टीमवर नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर यांच्या विरोधात केवळ गोवाच नाही तर बंगालमधील अनेक नेते नाराज आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही प्रशांत किशोर यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, कोणीही 'कॉन्ट्रॅक्टर'च्या माध्यमातून पक्ष चालवू शकत नाही. बॅनर्जी म्हणाले की, 'मी बऱ्याच काळापासून खासदार आहे, पण तिकिटासाठी कधीच माझा सल्ला घेण्यात आलेला नाही. मात्र, IPAC ने सर्व्हे करून अनेक नेत्यांना तिकिटांचे आश्वासन दिले होते. परंतु, ज्यांना आश्वासने देण्यात आली होती त्यांना तिकिट न मिळाळ्याने ते अपक्ष म्हणून उभे राहत आहेत असे बॅनर्जी यांनी म्हटले होते.

किशोर यांच्या टीमने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील पक्षाला मदत केली होती. त्यानंतर तृणमूलने गोवा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत (एमजीपी) युती करत यंदाची निवडणूक लढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT