मोबाइलचा वापर देशात खूप वाढला आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मुलांना मोबाईल दिला गेला. मग अभ्यास करण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी मुलं तासनतास मोबाईलवर घालवू लागली आहेत. बुधवारी याबाबत संसदेत माहिती देण्यात आली. त्यानुसार २३.८ टक्के मुले झोपण्यापूर्वी मोबाईल वापरतात. त्यामुळे ३७.१५ टक्के मुलांची एकाग्रता कमी झाली आहे.
राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात याविषयी माहिती दिली. Meity कडे मुलांमधील इंटरनेट व्यसनाबद्दल विशिष्ट माहिती नाही. पण, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मोबाईल वापराचा परिणाम अर्थात 'Effect' या विषयाव(शारीरिक, वर्तणूक आणि मानसिक-सामाजिक) केलेल्या अभ्यासातील डेटाचा हवाला दिला आहे.
मोबाइल फोन आणि इंटरनेर मुलं अगदी सहज वापरू लागली आहेत. त्यामुळेच ते जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवतात. किंबहुना आता मुलांचा मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर वाढल्याने २३.८० टक्के लोकांना झोपण्यापूर्वी मोबाईल लागतोच. तसेच सतत मोबाईल वापरल्याने त्यांची एकाग्रता कमी होत असल्याचाही अनुभव येत असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले. कोरोना काळात लोकांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुलांमधील मोबाईलचा वाढता वापर आणि त्याचे परिणाम याविषयी उत्तर देताना ही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.