स्लिम फिट - अनुष्का शेट्टी, अभिनेत्री
तुम्ही काय खाता यावर तुम्ही कसे दिसाल, हे अवलंबून असते. त्यामुळे मी खाण्याच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहते. चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी मी तब्बल २० किलो वजन कमी केले. त्यासाठी मी तेलकट तसेच जंक फूडचा पूर्णपणे त्याग केला. जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा वापर मी करत असते. शरीरातील साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी फळांचा रस घेते. दिवसातून ५ ते ६ वेळा जेवण घेते. यामुळे अनावश्यक कॅलरीज पोटात जात नाहीत. सकाळी मी ब्रेड आणि मध याचा नाश्ता करते.
मधाचे आपल्या निरोगी आयुष्यात खूप महत्त्व आहे. रात्रीचे जेवण मी नेहमीच रात्री आठ वाजण्याच्या आतच घेण्याच नियम पाळते. झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी घेतलेल्या आहारामुळे पचनशक्ती आणि फिटनेसही चांगला राहतो. मी पाणी पिण्याच्या बाबतीत खूपच दक्ष असते. मी दिवसातून किमान ६ लिटर पाणी पिते, तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते.
मला फिट राहण्यासाठी योगासने मदत करतात. यामुळे मला शारीरिक आणि मानसिक फायदेही होतात. मी रोज अर्धा तास योगासने करते. त्याचबरोबर जिमही करते. यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मसल्स टोन्ड करण्याचेच व्यायाम करते.
केसांच्या बाबतीतही खूप दक्षता घेते. त्यासाठी मी केसांना तेलाने मसाज करते. खोबरेल तेलापासून ते ऑलिव्ह तेलापर्यंत मी सगळ्या तेलांनी केसांना मसाज करून पोषण देत असते. नियमीत योगासने केल्याने केसांना, त्वचेलाही फायदा होत असतो. योगासने केल्याने त्वचेला चांगला ग्लो येतो आणि हेच माझ्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.