नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठा धुमाकूळ घातला आहे. गेल्या जवळपास तीन महिन्यांमध्ये दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात मृतांचा आकडा साडेतीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या लाटेच्या मागे मुख्य कारण आहे ते म्हणजे डेल्टा व्हेरियंट. कोरोना व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट्स सध्या जगभरात तयार झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजेच B.1.617 हा व्हेरिंयट जो सर्वांत आधी भारतात सापडला होता. अलिकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, या व्हेरिंयटचाच एक उपप्रकार B.1.617.2 हा मूळ व्हेरियंटपेक्षाही जास्त धोकादायक आहे. याचंच डेल्टा व्हेरियंट असं नामकरण केलं गेलं आहे. (All about Delta variant of Covid 19 and why is it a concern in India)
या व्हेरियंटचा सब-लिनीएज म्हणजेच उप-प्रकारामुळेच कोरोनाची ही दुसरी लाट धुडगूस घालत आहे. डेल्टा व्हेरियंट हा आधी मिळालेल्या अल्फा व्हेरियंटपेक्षा 50 टक्क्यांनी अधिक संक्रमणकारी आहे. याबाबतचं संशोधन नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि INSACOG च्या संशोधकांनी केलं आहे. यातून अशी माहिती समोर आली आहे की, ब्रिटनमध्ये सापडलेल्या अल्फा व्हेरियंटपेक्षा डेल्टा व्हेरियंट 50 टक्क्यांहून अधिक गतीने पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरियंटला डेल्टा हे नाव दिलं आहे. तसेच त्यास variant of concern (VOC) म्हणजेच चिंताजनक प्रकारात वर्गीकृत केले आहे. या व्हेरियंटमुळे संसर्ग वाढला असून जगातील अनेक देशांमध्ये या व्हेरियंटचा उद्रेक होतो आहे, म्हणून हा अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटना एखाद्या व्हेरियंटला तेव्हा चिंताजनक प्रकारात वर्गीकृत करते, जेंव्हा त्या व्हेरियंटची संक्रामकता अधिक वाढलेली असते. या व्हेरियंटमुळे जेंव्हा करण्यात येणाऱ्या उपाचारांवक अधिक ताण वाढतो, तेंव्हा तो अधिक धोकादायक ठरलेला असतो. म्युटेशन्सवरुन अथवा व्हायरसच्या जेनेटीक मटेरिअलवरुन वेगवेगळ्या व्हेरियंट्सचे गुणदोष ठरवले जातात. कोरोनाचा SARS-CoV-2 हा RNA व्हायरस आहे. हा 30,000 अमिनो एसिड्सच्या जोड्यांनी बनलेला असतो ज्या विटांप्रमाणे एकमेकांनंतर रचलेल्या स्वरुपात असतात.
या रचनेमध्ये थोडा जरी बदल झाला तर त्यास म्युटेशन म्हणतात, ज्यात व्हायरसचा आकार तर बदलतोच शिवाय स्वभाव देखील बदलतो. डेल्टा व्हेरियंटमधील स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक रूपांतरणे आहेत. त्यातील कमीतकमी चार म्युटेशन्स महत्वाचे आहे. यापैकी एक आहे L452R म्हणतात, गेल्या वर्षी मार्चमध्ये डेन्मार्कमध्ये हा पहिल्यांदा सापडला होता. हे म्युटेशन वाईल्ड-टाईप स्ट्रेनपेक्षा अधिक संक्रमणीय असल्याचे आढळले आहे. रिपोर्टनुसार, देशात डेल्टा व्हेरियंटचे 12,200 हून अधिक रुग्ण आतापर्यंत समोर आले आहेत. देशात जवळपास सर्वच राज्यांमध्ये हा व्हेरियंट सापडला आहे. खासकरुन या व्हेरियंटचा प्रभाव दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ओडिसा और तेलंगना राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.