health-fitness-wellness

हृदयविकार आणि कोरोना टाळायचाय? दहा आयुर्वेदिक उपाय करा ट्राय

नामदेव कुंभार

प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस 13' या रिअ‍ॅलिटी शोचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे दोन ऑगस्ट रोजी (गुरुवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. कलाकार म्हणून सिद्धार्थने स्वत:ला अगदी तंदुरुस्त ठेवलं होतं. पण वयाच्या 40 व्या हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मागील काही दिवसांच्या आकडेवारीनुसार, 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनेकांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहा वयाच्या चाळीशीत अनेकांना हृदयविकाराचा झटका येत आहे.

कोरोना महामारीच्या काळात हृदयविकारामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चार मृत्यूपैकी एकाचा मृत्यू हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी रोग अथवा हृदयविकाराचा झटक्याने होत असल्याचं समोर आलं आहे. इतरांपेक्षा भारतीयांमध्ये 8 ते 10 वर्ष आधीच हृदयविकाराचा धोका संभवतोय. हृदयविकारामुळे मृत्यु झालेल्यांमध्ये 40 टक्के लोक हे 55 पेक्षा कमी वयाचे आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराची प्रमुख कारणे, व्यायामाचा अभाव, अतिताणतणाव, धूम्रपान व मद्यपानाची सवय, लठ्ठपणा, अयोग्य जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची खराब पातळी असू शकतात. त्याशिवाय, सध्या सर्वजण कोरोना महामारीचा सामना करत आहेत. दिवसेंदिवस करोना आपले रुप बदलत (म्युटेट) आहे. सध्याची परिस्थिती पाहाता याला अंत नाही, असे दिसत आहे. कोरोना काळात अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू झाला. ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. अशाच आजाराचा सामना करण्यासाठी जाणून घेऊयात आयुर्वेदिक तज्ञांनी सांगितलेल्या टिप्स...

चालणे -

सूर्योदयापूर्वी दोन तास चालणे निरोगी आरोग्यासाठी फायद्याचं आहे. यामध्ये अनेक आजार जवळही फिरकणार नाहीत. एका अभ्यासानुसार, चालण्यामुळे सांधे आणि हृदयावर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या जुनाट आजारांविरुद्ध लढण्यास मदत होते. सकाळी लवकर उठणारे हायड्रेटेड राहतात. सकाळी ऑक्सिजनची मात्रा जास्त असते त्यामुळे स्वत: ला ऑक्सिजन देणे चांगले राहते. उशीरा उठणारे दिवसभर जाण्याची शक्यता असते. सकाळच्या वेळी मन शांत आणि सजग असते. अशावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आत्मसात करता येतील. चालण्यामुळे वजन कमी होते, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार होण्याची शक्यता कमी होते, रक्त परिसंचरण सुधारते, हाडे आणि स्नायू बळकट होतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होऊ शकते

कोमट पाणी -

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी पिल्यानंतर शरिराला अनेक फायदे होऊ शकतात. कोमट पाणी पिल्यामुळे शरीरात विष जमा होऊ देत नाही आणि प्रणाली क्षारीय बनते. तसेच रक्त परिसंचरण सुधारते.

योगा आणि ध्यान करा -

योग आणि ध्यान आपल्या आरोग्यास अनेक फायद्यांबरोबर मूड वाढवू शकतात. लयबद्ध श्वसनाला योगात खूप महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच योगसाधना करणार्‍याचे आयुष्य वाढते. योग आणि ध्यान केल्यामुळे तुमचा नक्कीच ताण कमी होईल. तसेच मन शांत होण्यासही मदत होते. एका अभ्यासानुसार, मागील दोन वर्षांपासून नैराश्य हे हृदयविकाराचे प्रमुख कारण ठरत आहे. योग आणि ध्यान केल्यामुळे नैराश्य नाहिसे होण्यास मदत होते.

सूर्यस्नान -

आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार, सूर्यप्रकाशाचे बरेच फायदे आहेत. जर शरीरावर सूर्यप्रकाशाने शरीराला शेक दिला तर आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. रक्ताभिसरण, शरीरात शीतलता आणि पित्त दूर होते, व्हिटॅमिन डी, प्रतिकारशक्ती वाढवते, सकारात्मक हार्मोन्स तयार होतात, पचन सुधारते, शरीरावरील कोरडेपणा दूर होतो त्याशिवाय झोपेची समस्याही दूर होऊ होते. सकाळी सुर्यप्रकाशाचा शेक घेतल्यानं ताजेतवाने वाटतं.

जेवणाची योग्य वेळ -

जेवणाची वेळही तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. योग्य वेळी अन्न घेतल्यास अनेक आजार दूर जातील. दुपारचं जेवण साधारणपणे 12 ते 12 च्या दरम्यान करावे. सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारचं जेवण चार ते पाच तासांच्या फरकानंतर करावे. अन्न खाल्ल्यानंतर पाणी कमी प्यावे. जेवनानंतर दोन तासांनंतरच पाणी प्यावे.

दुपारी झोपणं टाळा -

दुपारी झोपणं टाळा. दुपारी झोपल्यामुळे थकवा आणि सुस्ती जाणवते. शिवाय आपले झोपेचे चक्र बदलते.

हळदीचं दूध -

संध्याकाळी झोपण्यापूर्वी हळदीचे कोमट दूध प्यावे. त्यात बदाम असेल तर अधिकच उत्तम. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारखे विकार होत नाहीत. हळीच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन कमी होण्यास मदत होते, चांगली झोप लागते, हाडे मजबूत होतात आणि हृदय निरोगी राहते.

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात काय करावे?

उन्हाळ्यात जड वर्कआउट टाळा. त्याऐवजी योग आणि प्राणायाम अथवा सौम्य व्यायामाला प्राधान्य द्या. कारण वातावरणातील उष्णता तुमच्या ऊर्जा साठ्यातून बाहेर पडेल. हिवाळा आणि इतर ऋतूंमध्ये, हार्डकोर वर्कआउट करता येतात.

ताजे अन्न -

आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, निरोगी आयुष्यासाठी ताजे शिजवलेले अन्न वेळेवर घ्या. शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि चांगल्या चैतन्यासाठी ताजे अन्न फायद्याचं ठरते.

ध्यान -

तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही कामात प्रचंड व्यस्त असाल. थोडाही वेळ नाही. कामामुळे तणावात असाल तर ध्यान करणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत असायला हवं. मन शांत करण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. ध्यान केल्यामुळे तुमच्यातील एकाग्रता वाढते, असे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री योगाचे प्रादेशिक संचालक गौरव वर्मा यांनी सांगितले आहे.

( वरील सर्व माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री योगाच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मिताली मधुस्मिता यांनी दिलेली आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT